पान:संतवचनामृत.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४.] प्रातिभश्रावणादर्श. पारियाचा रवा घेता भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधले संपूर्ण माझ्या हातीं ॥ ८. प्रातिभश्रावणादर्श. ४५. रक्त, शुभ्र, नील, पीत अर्थ समजून तुझी मौन्य धरा. सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर । संत्रावी निरंतर वसे जेथें ॥ रक्त शुभ्रवर्ण निळा पीत दिसे । दृष्टि शुद्ध असे तयामध्ये ॥ फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन।अर्थ हा समजोन मौन्य धरा॥ गुह्याचेही गुह्य निवृत्तीने दाविलें ।मीच याचां हो बोले बोलतसे॥ ४६. नाना वर्णाचा अखंड तमाशा. अखंड तमासा डोळां देख निका । काळा निळा पारवा बाईयांनो॥ सदोदित नयनी नयन हारपे । निळ्याचे स्वरूपे मनी वसो॥ अकरा वेगळे नाही वा आणीक । माझे नेत्री देख शुद्ध ज्योती ॥ ज्ञानोबाची वाणी पूर्णरूपी घ्यावी । देहींच पाहावी आत्मज्योती॥ ४७. “बरवें रूप काळें अमोलिक." मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणे मिरविले रूप त्याचें ॥ बरवे रूप काळे अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुद्धभावें ॥ रखुमादेवीवरु अगाध काळे । म्हणोनि सर्वत्र अर्पियले ॥ १ पारा. २ जीवनकळा, अमृतकळा. ३ तमाशा, चमत्कार. ४ मागे वळणे. ५ घालणे.