पान:संतवचनामृत.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। संतवचनामृत : ज्ञानदेव. [६४३ धर्म अर्थ काम पूर्ण दान मान संदेहो। नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामी टाहो ॥ कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं। चिंता हे हारपली माझी नित्य अमृताची वाटी। मन हे निमग्न जाले नित्य वसे वैकुंठीं। तापत्रय ताप गेले नाना दोषांचे थाटीं ॥ आत्माराम निर्गमले वेदशास्त्र गुह्यज्ञान । वासनाचि मोहोजाळी ते विराली नाना स्थाने । फुटले नाना घट तुटली नाना बंधने । सुटल्या जीवग्रंथि ऐसे केले त्या गुरुज्ञाने ॥ बुद्धिबोध संवगडे सजीव करचरण । । नयनी नयन जाले चक्षु मी समाधान । दिव्यदेह अमृतकळा दशदिशा परिघन । सर्व हे ब्रह्म जालें फळद फळले विज्ञान ॥ निवृत्तिगुरु माझा अंधपणा फेडिलों। सर्वत्र दृष्टि जाली एकतत्त्वे राहिलों । निरसली माया मोहो श्रीराम अंजन ले लो। ज्ञानदेव ज्ञानगंगें निवृत्तीने बुडविलो॥ ४४. ज्ञानदेव ह्मणतात की निवृत्तीने संपूर्ण वर्म माझें हाती दिले. तीर्थ बत नेम भावविण सिध्दी । वायांचि उपाधी करिसी जना॥ भावबळे आकळे येहवीं नाकळे । करतळी आंवळे तैसा हरी॥ १ समुदाय. २ प्राप्त होणे. ३ मिथुन. ४ नाहीशी होणें. ५ घालणे, ६ आंवळा, एक प्रकारचे फळ.