पान:संतवचनामृत.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - संतवचनामृत. समाधि एदलाबाद येथे शके १२१९ मध्ये झाली. निवृत्तिनाथांची समाधि ब्रह्म-- गिरीच्या पायथ्याजवळच आहे. त्यांस ज्ञानदेव व इतर भावंडे गेल्यावरं जिणे जड होऊन " वळचणीचे पाणी आढ्यासि गेलें" असे वाटले, व जेथे आपल्यास प्रथम गहिनीनाथांचा प्रसाद झाला त्याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याजवळ त्यांनी समाधि घेतली, व आपला देह गुरूस अर्पण केला. ज्ञानेश्वरांची ज्यावेळी आळंदी येथे समाधि झाली, त्यावेळी निवृत्ति, नामदेव इत्यादि संत तेथे हजर होतेच, व त्या वेळचा सोहळाही फार अवर्णनीय होता. ज्ञानदेव गेल्यावर बरोबर एक महिन्याने सोपानदेव हे सासवड मुक्कामी जाऊन तेथे समाधिस्थ झाले. मुक्ताबाईंनी ज्यावेळी एदलाबादेस समाधि घेतली त्यावेळी त्या विजेच्या कडकडाटांत निमून गेल्या अशी जी गोष्ट आहे, ती कदाचित् ज्ञानेश्वरांच्या या पुढील अभंगाच्या आधारें लिहिली गेली असेल:- .............. :.'.!.: 1. . मोतियांचा चूर फेडिला अंबरी । विजुचिया परी कीळ झालें ॥ ...... . जरी पीतांबर नेसविले नभा । चैतन्याचा. गाभा नीळबिंदुः॥ . ..... तळीवरी पसरे शून्याकार झालें । सर्पाचेही पिलें नाचू लागे । ..... कडकडोनि वीज निमालीच ठायीं । भेटली, मुक्ताई गोरोबाला ॥.. .. ..ज्ञानदेव म्हणे कैसी झाली भेट । ओळखिले अविट, आपुलेपण. ॥ .....:, . . ३. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जी आपली गुरुपरंपरा दिली आहे तीच निवृत्तिनाथांनी आपल्या अभंगांत क्रमांक १ मध्ये दिली आहे. मत्स्येंद्रनाथांनी आपली "मुद्रा" गोरक्षांस दिली, व गोरक्षांनी गहिनीनाथांवर पूर्ण रुपा केली; गहिनीनाथांपासून निवृत्तीस परमार्थ मिळून त्यांचे सर्व कुळच कृष्णनामाने पावन झाले (क्र. १). गुरु करणे असेल तर जो प्रत्यक्ष देव आपल्या डोळ्यांस दाखवील असाच गुरु करावा, व तनुमनधन त्यास देऊन त्यापासून वस्तु मागून घ्यावी असें निवृत्तिनाथ सांगतात (क..) देहामध्ये देव आहे ही गोष्ट सास; परंतु वासना शुद्ध झाल्यावांचून तेथें देव प्रकट होत नाहीं (क्र. ८). अंतःकरण शुद्ध करण्याचा एक मार्ग म्हटला म्हणजे परापवाद अगरं परनिंदा कानी पडल्याबरोबर त्याकडे लक्ष न देतां निजमौन्याने कृष्णाचा जप करणे हा होय (क. १०) स्वतःची स्तुति व दुसन्याची निंदा ही न ऐकतां 'ऑपलें भान विष्णुपणामध्ये लोपून जावें (क्र. ११). ज्याच्या मुखांतून नामाची "' अमृतसरिता अखंड वाहते तोच एक घट पूर्णतेस पोचला आहे. असे समजावें। . . .. . त