पान:संतवचनामृत.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ संतवचनामृतः ज्ञानदेव. [६४१ हे तो तुझींच पांचैं तत्त्वे तरि तूं मज कां भोगवितोसि यातायाती रया॥ लाजेसी ना देवा माझे म्हणतां संन्याशासवे कैंची रे कांता। इंद्रिये दारुण जीवआत्मयासी हे तो सुखदुःखप्राप्ति । तेणे हे कारण की आत्मा पावे यातायाती। इंद्रिये दंडून तप जे करावे ऐसे बोलती वेदश्रति । साही जणांसी वेवाद लाविला हे तो तुझीच करणी सांगतीरया॥ मिथ्या हा प्रपंच की दर्पणाचे दुजे जवळी बिंब प्रकाशे। एक साचे दुजे दिसे तैसेचि दुसरे कां प्रतिभासे । लटिके म्हणों जाय तंव तेथे मन का विश्वासे। सगुण निर्गुण हे तो तुझीच माया तुझी तुजमाजी दिसे रया ॥ पुरे पुरे आतां जड जाले जिणे उरी नाही देवा लाजिरवाणे। ऐसी इंद्रिये वासनेसी आणिजती ते तुझी तुजमाजीं सामावती। समस्त जीव हे तो तुझे आकारले येरी ते लटिकीच भ्रांति । जाणसी ते करी देवा तेचि ते मागों किती। दग्धबीज तरु बीजी सामावला तैसा तुजमाजी श्रीगुरु निवृत्ति रया।। ४२. बापा विठ्ठला, त्वां मजशी अबोला कां धरिला ? नभ नभाचेनि सळे । क्षोभु वाहिजे काळिंदजिकै । सासिनले जगाचे डोळे । तें रूप पाहावया ॥ भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची थाव । लावण्यसिंधु सिंव। सोडूनि जातो गे माये ॥ कटावरी ठेवुनी हात। जना दावी संकेत। भवजळाब्धीचा अंत । इतुलाची॥ १ तंटा. २ मावणे. ३ उसळणे. ४ भरास येणे, उत्सुक होणे. ५ मर्यादा.