पान:संतवचनामृत.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४१] ज्ञानदेवांचे वैराग्ययुक्त बोल. ३३ ४०. चंदनाच्या चोळीने माझे सर्वांग पोळत आहे. घनु वाजे घुणधुणा वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा वेगी भेटावा कां॥ चांद वो चांदणे चौपे वो चंदन । देवकीनंदनेवीण नावडे वो ॥ चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी। कान्हो वनमाळी वेगी भेटावा कां ॥ सुमनाची सेज सीतळ वो निकी । पोळे आगीसारिखी वेगीं विझवा कां॥ तुम्हीं गातसां सुस्वरें ऐको नेदावी उत्तरें। कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनी ॥ दर्पणी पाहतां रूप न दिसे वो आपुले। बाप रखुमादेवीवर विठ्ठले मज ऐसे केले ॥ ४१. ज्ञानदेवास जिणे जड होतें. तुजपासाव जन्मलो हरि पुढती सामावलो तुझ्या उदरीं। तुझिया व्यापकपणे चाले सत्कर्माची दोरी। सायखेडियाचे बाहुले कैसे हावभाव धरी । सूर्यकांतवेधे अग्निच प्रसवे सहज समंधु ऐसा धरी रया ॥ जेथे पाहे तेथे तूंचि दिससी लपोनियां अबोला कासया धरिसी। रसना रस सेवावे हे तो जीवआत्मयाची स्थिति । श्रवर्णी ऐकणे की नेत्री देखणे हे तो तुझीच नादश्रुति । घ्राणासि परिमळ घेणे की हस्तपादादिकां चळगति । १ कृष्ण. २ चंद्र. ३ चाफा. ४ भाजणें. ५ कळसूत्री. सं...३ .