पान:संतवचनामृत.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६३५ ६. ज्ञानदेवांचे वैराग्ययुक्त बोल. ३७, जवळ असून देवाची भेट नाही. परिमळाची धांव भ्रमर ओढी। तैसी तुझी गोडी लागो मज ॥ आविट गे माय विटेना । जवळी आहे परि भेटेना॥ तृषालागलीया जीवनाते वोढी । तैसी तुझी गोडी लागो या जीवा ॥ बापरखुमादेवीवरा विठली आवडी|गोडियेसीगोडी मिळोन गेली॥ __३८. उघडया पाठीवर हीव वाजत असल्यने देव मला केव्हां घोंगडे देईल ? रात्रीदिवस वाहातसे चिंता । केधवां धडौता होईन मी ॥ खिरजट घोंगडे फाटके ते कैसे । वेचिले तैसे भोगिजे गा। वित्त नाहीं गांठी जीवित्वा आटी । उघडी पाठी ही वाजे ॥ घोंगडे देईल तो एक दाता । बापरखुमादेवीवरा मागो रे आतां। ३९. मी दूरदेशी पडले असल्याने देवाची भेट मला केव्हा होईल? पडिले दूरदेशी मज आठवें मानसीं। नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥ दिनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावुनि गेला अझुनी कां न ये ॥ गरुडवाहना गंभीरा येईगा दातारा। बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला॥ १ पाणी. २ सवस्त्र. ३ झिजविलेलें. ४ श्रम. ५ थंडी.