पान:संतवचनामृत.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३६ ] संतांची योग्यता. ३१ वत्स विघडेलियां धेनु भेटली। जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥ है पीयूषापरते गोड वाटत । पंढरीरायाचे भक्त भेटत ॥ बाप रखुमादेवीवर विठ्ठले। संत भेटतां भवदुःख फिटले॥ ३४. हरि भक्तांच्या धांव्यास पावतो. त्रिवेणीसंगी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाहीं नामीं तरि ते व्यर्थ ॥ नामासी विन्मुख तो नर पापिया। हरिवीण धांवया नपवे कोणी॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नाम तिन्ही लोक उद्धरती ॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ३५. “राजयाची कांता काय भीक मागे ?" श्रीगुरुसारिखा असतां पाठिराखा । इतरांचा लेखां कोण करी ॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिया जोगें सिद्धि पावे॥ कल्पतरुतळवटी जो कोणी बैसला।काय वाणी त्याला सांगिजोजी॥ शानदेव म्हणे तरलो तरलो। आतां उद्धरलो गुरुकृपे ॥ ३६. धनजेचे चिरगुट जतन करण्यास राजास कष्ट पडतात काय ? पाहे पां ध्वजेचे चिरगुट । राया जतन करितां कष्ट । तैसा मी एक पतित । परि तुझा मुद्रांकित ॥ मषीपेत्र ते केवढे । रावो चालवी आपुल्या पाडे । बाप रखुमादेवीवरदा । सांभाळी आपुल्या ब्रीदा ॥ १ वियोग झालेल्यास. २ हरिणी. ३ हरणाचे पोर. ४ अमृत. ५ धांव्यास. ६ गणना, किंमत, ७ तोटा. ८ वस्त्र. ९ दौत, व लेखणी.