पान:संतवचनामृत.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ - संतवचनामृत : ज्ञानदेव. [६२५ ... २५, नामामृतगोडी मिळाल्यास जीवनकळा प्राप्त होईल. संतांचे संगती मनोमागे गति । आकळावा श्रीपति येणे. पंथे ॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। आत्मा जो शिवाचा राम जप ॥ एकतत्त्वनाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ नामामृतगोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता॥ ज्ञानदेव म्हणे नाम है सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ____ २६. हरिपाठ हीच समाधि, व हरिपाठ हीच संजीवनी. सर्वसुखगोडी सर्वशास्त्र निवडी। रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप। कृष्णनामी संकल्प धरुनी राहे ॥ निजवृत्ति काढी सर्वमाया तोडी। इंद्रियां सवंडी लपो नको॥ तीर्थवती भाव धरी रे करुणा । शांतिदया पाहुणा हरि करी ॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥ २७. सगद्गद वाचेनें नामस्मरण केले असतां हरीस करुणा येईल. एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी॥ तें नाम सोपारे रामकृष्णगोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ नामापरते तत्त्व नाहीरे अन्यथा। वायां आणिका पंथा जासी झणी ॥ ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरीं । धरोनि श्रीहरी जपे सदां ॥ २८. नवनीताप्रमाणे निवडून देवाचे स्मरण केल्यास.हरि हा _ घनदाट भरलेला दिसेल. चहं वेदीजाण साहीशास्त्री कारण । अठराही पुराणे हरिसी गाती॥ मंथुनि नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी माणु॥ १ सतरावी कळा. २ आधाराने, पाठीमागें. ३ सद्गदित होऊन,