पान:संतवचनामृत.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३४] नामाचे महत्त्व. २७ सकळांचा सकळी त्यात तूं आकळीं। जिव्हा हे वाचाळी रामरतीं। रिघे रे शरण तुज नाहीं मरण । ठाकिसी चरण श्रीविठ्ठलाचे॥ निवृत्तिप्रसाद जोडे विठ्ठलनामै घडे । ज्ञानदेव बागडे पंढरीये ॥ - २२. प्राणास उलट मार्ग लावून अजपाजप करा. सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥ तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । येथे काही कष्ट न लगती॥ अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धार असे ॥ ज्ञानदेवा जिणे नाविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥ २३. केवळ हरिजपानेंच प्रपंचाचे धरणे सुटेल. भावेवीण भक्ति भक्तीवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे॥ शानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचें ॥ २४. नामाकडे जिव्हा दिली असतां भाग्यास सीमाच नाही. काळ घेळ नाम उच्चारितां नाहीं। दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥ रामकृष्णनाम सर्वदोषहरण । जडजीवां तारण हरि एक ॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ । पूर्वजां वैकुंठमार्ग सोपा ॥ १ नाचणे. २ जप न करतां झालेला जप. ३ आईकडील व बापाकडील.