पान:संतवचनामृत.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३१] . संतांची योग्यता.. एक हरि आत्मा जीवशीवसमा । वायां तूं दुर्गमा न घाली मनः॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ २९. रामकृष्णटाहो फोडिला असतां वैकुंठभुवनांत घर होईल. जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटी राम भावशुद्ध ॥ न सोडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी।। जात वित्त गोत कुळ शीळ मात । भजे कां त्वरित भावनायुक्त ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनीं । तेणे वैकुंठभुवर्नी घर केले ॥ M ५. संतांची योग्यता. ३०. साधूंची भानुबिंबाप्रमाणे अलिप्तता. शर्करेची गोडी निवडावया भले । साधु निवडिले सत्संगती॥ सत्संगे प्रमाण जाणावया हरी। येर ते निर्धारी प्रपंचजात ॥ भानुबिंब पहा निर्मळ निराळ। अलिप्त सकळ तैसे साधु॥ . ज्ञानदेव हरि जपोनि निर्मळ । सदा असे सोज्वळ निवृत्तिसंगें ॥ ३१. संतांच्या अगाध देण्यापुढे चिंतामणि ठेंगणा वाटतो. संत भेटती आजि मज । तेणे जालों चतुर्भुज । दोनी भुजा स्थूळी सहज । दोनी सूक्ष्मी वाढल्या ॥ ... आलिंगने सुख वाटे। प्रेमें चिदानंद गोठे। __१ ऐक्य. २ पूर्ण. ३ हांक मारणे, ओरडणे. ४ आकाशाप्रमाणे. ५ दाटतो. - - - -