पान:संतवचनामृत.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [$१९ १९. जन्मजन्मांतरीची पुण्यसामुग्री असेल तरच हरिनाम वाचेस येईल. जन्मजन्मांतरी । असेल पुण्यसामुग्री। तरिच नाम जिव्हाग्री । येईल श्रीरामाचें ॥ धन्य कुळ तयाचें । रामनाम हेचि वाचे । दोष जातील जन्माचे । श्रीराम म्हणतांचि ।। कोटि कुळांचे उद्धरण । मुखीं नाम नारायण । रामकृष्ण स्मरण । धन्य जन्म तयाचें ॥ नाम तारक सांगडी। नाम न विसंबो अर्धघडी। तप केले असेल कोडी। तरिच नाम येईल ॥ ज्ञानदेवी अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटां। कुळ गेले वैकुंठा । हरि हरि स्मरत ॥ २०. पापराशि, भूतबाधा, सर्व नामस्मरणाने लय पावतील. हरिउच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥ तृणं आग्निमेळे समरस झाले । तैसे नामें केलें जपतां हरि॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणे तेथे ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ २१. रामकृष्णनामाचीच माळा गळ्यांत घाला. कर्माचिया रेखा नुलंघती अशेखा । म्हणोनि विशेखों केशवसेवा। रामकृष्ण माळा घाला रे पां गळां। अखंड जीवनकळा राम जपा॥ करावा विचार धरावा आचार । करावा परिकर रामनामीं ॥ १ भोपळ्याची सांगड, २ गवत. ३ भीतीनें. ४ मर्यादा, ५ विशेष महस्वाची. ६ निश्चय.