पान:संतवचनामृत.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

RAA . . . . . BAR A EP 4 A - . . . - La . . संतवचनामृत. . . - . . - प्रस्तावना. - - - - - -- - . . . . : १. अध्यात्मगंधमालेच्या या दुसऱ्या पुस्तकांत निवृत्तिज्ञानेश्वरांपासुन लो भेट ‘जनार्दनएकनाथांपर्यंत जे संतकवि महाराष्ट्रांत निर्माण झाले त्यांच्या चरित्रांचा व शिकवणीचा थोडक्यांत इतिहास यावयाचा आहे. हा : जो नीनचारशे वर्षांचा काल आहे त्याचे सहजच तीन भाग पडतात. पहिल्या भागांत निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, व चांगदेव यांच्या अभंगांचा विचार व्हावयाचा आहे. दुसऱ्या भागांत नामदेव व इतर पंढरपुरांतील व पंढरपुरनजीकचे सर्व जातीचे व धंयांचे जे भगवद्भक्त होऊन गेले त्यांच्या शिकवणीचा विचार होईल. . निसत्या भागांत भानुदास, जनाईनस्वामी, व एकनाथ यांच्या अभंगांचा विचार होऊन हा ग्रंथांक पुरा व्हावयाचा आहे. ... ज्ञानदेवादि संत. २. या ग्रंथमालेच्या पहिल्या पुस्तकांत ज्ञानेश्वरांची सर्वांगीण शिकवण कशी होती याचा ज्ञानेश्वरीच्या आधारे आपण ऊहापोह केलेलाच आहे. तेथेंच निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, व मुक्ताबाई यांचे अल्पचरित्रही दिले आहे, ते वाचकांच्या लक्षात येईलच. निवृत्तिनाथांचा जन्म शके ११९५ मध्ये होऊन त्यांची समाधि शके १२१९ मध्ये नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाली. ज्ञानेश्वरांचा जन्म निवृत्तिनाथांच्या नंतर दोन वर्षांनी म्हणजे शके ११९७ मध्ये होऊन त्यांची समाधि निवृत्तिनाथांच्या अगोदर एक वर्ष म्हणजे शके १२१५ मध्ये आळंदी येथे झाली. सोपानदेवांचा जन्म शके ११९९ मध्ये होऊन शके १.३.३५ मध्ये त्यांची समाधि सासवड येथे झाली. सुकाबाईंचा जन्म शके 9 माये होऊन त्यांनी . . .