पान:संतवचनामृत.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ ६१८] नामाचे महत्त्व. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी। ते जीवजंतूंसी केंवि कळे ॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ १७. संपत्ति आटे, नाम नाटे. अंडज जारज स्वेदज उद्भिज । आटे, हरिनाम नाटे ते बरवें ॥ जे नाटे ते नाम चित्ती । रखुमादेवीपति श्रीविठ्ठलाचें ॥ शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम न आटे ते बरवें ॥ बापरखुमादेवीवराचे नाम नाटे । युगे गेली परि उभा विटे ॥ १८. नामस्मरणाने अनेक संतांचा उध्दार झाला आहे. नाम प्रल्हाद उच्चारी। तया सोडवी नरहरी। उचलूनि घेतला कडियेवरी। भक्त सुखे निवाला ॥ नाम बरवयां बरवर्ट । नाम पवित्र चोखट। नाम स्मरे नीलकंठ। निजसुखे निवाला ॥ जे धुरूसी आठवलें। तेचि उपमन्ये घोकिले। तेचि गजेंद्रा लाधले। हित जाले तयाचें ॥ नाम स्मरे अजामेळ । महापातकी चांडाळ। नामें जाला सोज्वळ । आपण्यासहित निवाला । वाटपाडी कोळिकु। नाम स्मरे वाल्मीकु। नामें उद्धरिले तिन्ही लोकु । आपण्यासहित निवाला ॥ ऐसे अनंत अपार । नामें तरले चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेवीवराचे ॥ १ देव, परमात्मा. २ जरायुज, ३ वृक्षादिक, ४ आटत नाही. ५-६ उत्तमांत उत्तम. ७ ध्रुव. ८ वाटमाऱ्या. ९ समर्थ, बलवान् .