पान:संतवचनामृत.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ संतवचनामृतः ज्ञानदेव. [६५ राखोडी कुंकितां दीप नलगे जयापरी। तैसा शब्दब्रह्म कुसरी शान न पवे। व्रत तप दाने वेचिले पोटा। दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥ मृगजळाची नदी दुरूनि देखोनि । धांवे परि गंगोदक न पवे तान्हेला जैसा । तैसे विषयसुख नव्हचि हित । दुःख भोगितो बहुत परि सावधान नव्हे ॥ परतोनि न पाहे धांवतो सैरा। करितो येरझारा संसारींच्या। ज्ञानदेव म्हणे बहुता जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥ ६. सुवस्तु सांडून कुवस्तूचे सेवन का करावे ? संसारयात्रा भरली थोर । अहंभावे चळे हाटबाजार । काम क्रोध विवेक मद मत्सर । धर्म लोपे अधर्म वेव्हार ।। यात्रा भरली जनीं । देवीं विन्मुख प्राणी। विषयांचा दाटणी । भ्रांति आड रे॥ एकी मीपणाच्या मांडिल्या मोटा। अहंभावाच्यागोणिया सांडिल्या चोहटीं। एकी गाढवावरीभरिली प्रतिष्ठा । तन्हि तृप्ति नव्हे दुर्भरा पोटा ॥ एक पंडितपण मिरविती श्रेष्ठ । एक शान विकून भरिती पोट । हिंसेलागी वेद करिताती पाठ।चौन्यांशी जिवां भोवतसे आर्ट। अज्ञानभ्रांतीची भरली पोती । सुवस्तु सांडूनि कुवस्तु घेती। १ गोडी, २ बाजार. ३ गांठोडी. ४ चव्हाट्यावर. ५ त्रास, श्रम.