पान:संतवचनामृत.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५] उपदेश. ४. माझे सर्व गोत पंढरीसच आहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन।। कासया त्यजीन प्राण आपुले गे माये ॥ असेन धणीवरि आपुले माहेरी। मग तो श्रीहरि गीती गाईन गे माये ॥ सकळही गोत माझे पंढरीसी जाण । बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाची आण ॥ - २. उपदेश. ५. प्राणी संसारांतच मरमरून जातात. उपजोनि संसारी आपुला आपण वैरी। मी माझे शरीरी घेऊनि ठेलें।। या देहात म्हणे मी पुत्रदाराधन माझे। परि काळाचे हे खाँजें ऐसे नेणतु गेला ॥ कामक्रोधमत्सराचेनि गुणे। बांधला आपण नेणे भ्रमितु जैसा। . मिथ्या मोहफांसां शुक नळिके जैसा। मुक्त परि आपैसा पळो नेणें ॥ जळचर आमिष गिळी जैसा कां लागलासे गळी । आप आपणापे तळमळी सुटिका नाहीं। तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रियां। फळपाकी पापिया दुःख भोगी ॥ १ तृप्ति होई पर्यंत. २ राहिला. ३ खाऊ, भोज्य. ४ मांसाचा तुकडा. सं...२