पान:संतवचनामृत.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८] उपदेश. सुखाचेनि चाडै सुखाची प्रीति। अमृत सांडूनियां विष सेविती॥ शांति क्षमा दया न धरवेचित्तीं। विषयावरी थोर वाढविली भाक्ति। जवळी देवो आणि दाही दिशाधांवती|स्वधर्म सांडूनि परधर्मी रति ऐसे जन विगुंतले ठाई । आत्महिताची शुद्धीचि नाहीं। नाशिवंत देह मानिला जिही तयांतृप्ति जाली मृगजळडोही रया॥ श्रीगुरुनिवृत्तीने नवल केले । देखणेचि अदेखणे करूनि दाविले। मीमाजी देवो याने विश्व व्यापिलें । बाप रखुमादेवीवरे विठले रया। ___७. मनास साक्ष ठेवून भक्ति कर. शरीर वरिवार का दंडिसी जंव वारिलें न करी तुझे मन । । जळी नेत्र लाऊनि टोकिती ऑविसालागोनि तैसे नको नको बकध्यान करूं रया ॥ चित्त सुचित' करी मन सुचित करीं न धरी तूं विषयाची सोय। वनी असोनि वनिता चिंतिसी तरि तपचि वाउगें जाय रया ॥ त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळी परि नवजती मनींचे मळ । तुझियानि दोषे तीर्थ कुश्चित जाले जैशी त्या रजऊची शीळ रया। आतां करिसी तरि चोखटचि करीं त्यासि साक्ष तुझे तुज मन । लटिकेन झकविसी तन्ही देवदुन्हा होसी बाप रखुमादेवीवरा _ विठ्ठलाची आण ॥ ८. देवाचें ध्यान करणे हेच सुखप्राप्तीचे साधन, श्रवण घ्राण रसना त्वचा आणि लोचन हैं तो दैन्याची द्वारें। वोळंगसी यांचे यांसींचि न पुरे तुज पुरविती काये । यालागीं धरिजेसु आपुली सोयँ रे बापा। १ दूर, परतें. २ आशाळभूतपणाने पाहणे. ३ आमिष. ४ परीट. ५ फसवणे. ६ आश्रय करणे. ७ मार्ग.