पान:संतवचनामृत.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानदेव. १ विठ्ठलभक्ति. १. सकळमंगळनिधि विठ्ठलाचे नाम घ्या. सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी॥ म्हण कां रे म्हण कां रे जना। श्रीविठ्ठलाचे नाम वाचे]॥ पतीतपावन सोचे । श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ॥ बाप रखुमादेवीवरु साचें । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥ २. एकटया विठ्ठलास जाणणे हीच भक्ति व हेच ज्ञान. सकळ नेणोनियां आन । एकला विठ्ठलुचि जाण ॥ पुढती पुढती मन । एकला विठ्ठलुचि जाण ॥ गुरुगम्य ही तयाची खूण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ बुझसी तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ हेचि भाक्ति हेचि ज्ञान । एकला विठ्ठलाचे जाण ॥ बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचि आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ ३. पूर्वसुकृताच्या जोडीमुळे विठ्ठलावर आवड उत्पन्न होते. रूप पाहतां लोचनी । सुख जाले हो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी ॥ सर्व सुखाचे आगरु । बाप रखुमादेवीवरु ॥ १ खरोखर. २ समजणें. ३ शेवट. ४ शपथ. ५ गडे. ६ पुण्य. ७ पिकण्याची जमीन.