पान:संतवचनामृत.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ३०] साक्षात्कार. आम्हां धर्म हरि आम्हां कर्म हरि। मुक्ति मार्ग चाही हरि आम्हां ।। कल्पतरु इच्छेसी सागरु । त्याहूनि आगरुं हरि माझा ॥ निवृत्ति सुवासु ब्रह्माचा प्रकाशु । विठ्ठलरहिवासु आम्हां पुरे ॥ २८. सुमनाच्या वासास जसे भ्रमर भुलतात तसे संत विठ्ठलांत लीन होतात. कमळाच्या स्कंधी गुणी गुढारले । वरि आकारले फूल तया ॥ सुमनाचेनि वासे भ्रमर भुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ तैसे हे संत विट्ठली तृप्त । नित्य पैं निवांत हरिचरणीं ॥ नाठवे हे दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसी हरिराज ॥ तल्लीन प्रेमाचे कल्लोळ अमृतांचे ! डिंगर हरीचे राजहंस ॥ टाहो करूं थोरु विठ्ठलकीर्तने । मनाच्या सुमनें हरी पुजूं ॥ निवृत्ति निवांत तल्लीन पैं जाला । प्रपंच अबोला हरिसंगें॥ २९. तंत आणि वितंतामध्ये उमटलेल्या अनाहतनादानें ___ गुरुनामस्मरण. तंत आणि वितंत त्यामाजि मथित । नाद उमटत स्वानंदाचा ।। सोहं बीजतत्त्व गुरुनाम मंत्र । ज्ञानी उपासित हरिराज ॥ भेदुनी कुंडलिनी गोल्हाट निकट । आत्माराम पेठ पांडुरंग ॥ निवृत्ति म्हणे मी सर्वस्व होईन । हरि हा भरीन पूर्ण देहीं । ३०. सर्वव्यापक ईश्वराची अखंड वाजणारी नौबत. जेथे पाहे तेथे व्यापिले अनंते । तयाविण रिते कोण ठाये ॥ गगनेविण ठावो नाहीं जैसा रिता । तैसा या अच्युताविण कांहीं ॥ १ सुगंध. २ गुप्त असणे. ३ लाडके लेक. ४ आडवे उभे तंतु; श्वासनिःश्वास. ५ एक चक्र. ६ रिकामें.