पान:संतवचनामृत.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६२४ नित्य पैं सोविळा अखंड पै निर्मळा।झणीं बारा सोळा म्हणाल तया। निवृत्तिदेवी कलिका मैं अमूप । विश्वीं विश्वरूप दावीतसे ॥ २५. श्रीकृष्णाचे रूप आम्हांस उन्मनीत भोगावयास सांपडतें. विकटं विकास विनंट रूपस । सर्व हृषीकेश दिसे आम्हां ॥ ते रूप साजिरे नंदाचे गोजिरें । उन्मनीं निर्धारें भोगू आम्हीं ॥ विलास भक्तीचा उन्मेष नामाचा । लेशु त्या पापाचा नाही तेथे ॥ निवृत्ति म्हणे ते सुखरूप कृष्ण । दिननिशी प्रश्न हरि हरि ॥ . ४. साक्षात्कार. २६. देह हेच आत्म्याचे मंदिर आहे. दिननिशीं नाहीं अवघा दीपक । एकरूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥ ते रूप सांगतां नये पैं भावितां । गुरुगम्य हाता एकतत्त्वे ॥ सांडावे . कोहं धरावे . सोहैं । अनेकत्वे ओहं एकतत्त्वीं॥ निवृत्ति साकार वैकुंठींचे घर । देह हे मंदिर आत्मयाचे ॥ २७. चंदनाचा सुवास, जाईजुईचा परिमळ, व कल्पतरूच्या _आगरुवापेक्षा हरि आम्हांस प्रिय आहे. चंदनाचे झाड परिमळे वार्ड। त्याहूनि कथा गोड विठ्ठलाची ॥ परिमळु सुमनी जाई जुई मोगरे । त्याहूनि साजिरे हरि आम्हां । १ ज्योत. २ मोठे, अपरंपार. ३ सुशोभित. ४ अहोरात्री.५ मोठे.