पान:संतवचनामृत.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ संतवचनामृतः निवृत्तिनाथ. [६३० तेथे माझ्या चित्ता करी रहिवासु । न करी उदासु ऐसियातें ॥ निवृत्तीने मन ठेविले चरणीं । नामाची निशाणी अखंडित ॥ ३१. "असें तें न दिसे, नसें तें आभासे." गगनीं अभ्र चाले चंद्र असे निश्चळ । पृथ्वीतळी बाळ चाले म्हणे॥ भ्रमाच भुलीव आलेसे पडळ । प्रत्यक्ष केवळ डोळियांसी ॥ असे ते न दिसे नसे ते आभासे । विषयांच्या विर्षे घोरलेसे ॥ निवृत्ति कवळ भ्रमाचा सांडिला । अखंड ध्यायिला हृषीकेश ॥ ___ ३२ निवृत्तिचातक हरीस्तव वरती पाहात आहे. आम्ही चकोर हरि चंद्रमा । आम्ही कळा तो पूर्णिमा । कैसा बाहिज़ भीतरी हरि । बिंबे बिंबला एकसूत्रीं॥ आम्ही देही तो आत्मा । आम्ही विदेही तो परमात्मा ॥ ऐक्यपणे सकळ वसे । द्वैतबुद्धि काही न दिसे ॥ निवृत्तिचातक इच्छिताहे । हरिलागी वरते पाहे ॥ ३३. दीपाची कळिका दीपांतच सामावते. दीपाची कळिका दीपींचि समावे। तैसाजिवशिव वोळखिवोजी॥ दीप आहे देही तयाचे हे प्रकाश। त्याचेनि सावकाश हरि भजे रया॥ न मिळे आयुष्य न मिळे घटिका । देह क्षण एका जाईल रया ॥ निवृत्तीचा दीप दीपाचिये अँसे । आटोनि सौरसे एक जाला ॥ ३४. कैसा देव देहांत दिवटीप्रमाणे प्रकाशमान होत आहे ! आम्ही किरण तूं सूर्यो । आम्ही अस्तु तूं उदयो। कैसा देही देवा दिवटा । परा पश्यंती चारी वाटा । १ नौबत. २ ढग. ३ व्यापणे. ४ प्रास, पडळ. ५ बाहेर. ६ ज्योत. ७ सोने वगैरे धातु आटवण्याचे पात्र. ८ समरसपणानें.