पान:संतवचनामृत.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२४] श्रीकृष्णाचे सगुणनिर्गुण वर्णन. रजतम गाळी दृश्याकार होळी । तदाकारजळी कृष्ण बिंबे ॥ निवृत्ति साकार शून्य परात्पर । ब्रह्म हे आकार आकारले ॥ २१. ईश्वराने प्रेमळांची घोडी धुतली आहेत. म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवांचातीत कृष्ण ॥ शब्दासी नातुडे बुद्धिसी सांकडे ।तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ उपचाराच्या कोडीन पाहे परवडी।तो प्रेमळाची घोडी धुये अंग॥ निवृत्तीचे तप फळले अमूप । गयनिराजे दीप उजळिला ॥ २२. कृष्ण हा अंधाऱ्या रात्री प्रकाशमान होणारा सूर्यच आहे. अंधारिये राती उगवे हा गभस्ति । मालवेना दीप्ति गुरुकृपा ॥ तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरी प्रकाशला ॥ आदि मध्य अंत तिन्हीं जाली शून्य ।तो कृष्णनिधान गोपवेषे॥ निवृत्ति निकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिनले ॥ २३. हरि हा आमच्या माजघरांत नांदत आहे. नाहीं जनीं विजनी विज्ञानीं । निर्गुणकाहाणी आम्हां घरीं ॥ सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजधरी आमुचिये ॥ आनंदसोहळा उन्मनीची कळा। नामचि जिव्हाळा जिव्हे सदा॥ निवृत्तिदेवां साधनी राणीव । हारपला भाव इंद्रियांचा ॥ २४. हरि नित्य सोंवळा असून अखंड निर्मळ आहे. सजीव साँजिरी तिगुण गोजिरी । नांदे माजधरी आत्मराजु ॥ सदाचार आम्हां नित्य हरिप्रेमा । नेणों मनोधर्मा प्रपंचाचिया॥ १ चारीवाणीच्या पलीकडचा. २ सांपडत नाही. ३ संकट, ४ प्रकार. ५ सूर्य. ६ अनुभवाचे ज्ञान. ७ सुंदर. ८ त्रिगुणात्मक, साकार. ९ गोंडस.