पान:संतवचनामृत.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत: निवृत्तिनाथ. [६१७ ३. श्रीकृष्णाचे सगुणनिर्गुण वर्णन. १७. कृष्ण हाच देव आम्ही हृदयांत पूजितों. कल्पना कोडूनि मन हे मारिले । जीवन चोरिले सत्रावाचे ॥ साजीव सोलीव निवृत्तीची ठेव । कृष्ण हाचि देव हृदयीं पूजीं॥ विलास विकृति नाहीं 4 अवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥ निवृत्ति कारण योगियांचे हृदयीं। सर्व हरि पाहीं दिसे आम्हां ॥ १८ श्रीकृष्णाचे सगुणरूपाने वर्णन. परोस परता पश्यंती वरुता । मध्यमे तत्वतां न कळे हरि ॥ ते हे कृष्णरूप गौळियांचे तप । यशोदेसमीप नंदाधरी ॥ चोखट चोखाळ मनाचे मवाळ । कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥ निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा । ब्रह्म सनातना माजी मन ॥ १९. श्रीकृष्णरूपामध्ये हे सकळ होत जाते. भरते ना रिते आपण वसते । सकळ हे होते तयामाजी ॥ ते रूप मैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ आशापाश नाहीं अशिजे पूर्णपणे । सकळ जग होणे एकरूप ॥ निवृत्ति तटाक रूपे ब्रह्म एक । जेथ ब्रह्मादिक हारपती॥ २०. शून्य गगनामध्ये उगवलेल्या चंद्राप्रमाणे श्रीकृष्णाचें तेज. निरशून्य गगनीं अर्क उगवला । कृष्णरूपें भला को सरलु ॥ ते रूप सुंदर गौळियांचे दृष्टि । आनंदाची सृष्टि नंदाघरी॥ या । जीवनकला. ३ विकार. ३ प्राप्ति. ४ चौथी, तुर्यावस्थेतील वाणी. ५ स्वसंवेद्य वाणी. ६ आकार, तेज. ७ अत्यंत शून्य. ८ अंकुर.