पान:संतवचनामृत.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१६] निवृत्तिनाथांचा उपदेश. सर्वत्र श्रीराम ऐसा करा वाचे । सुटतील मोहाचे मोहपाश ॥ तिमिरपडळ निमाली 4 दृष्टी । प्रपंच हे सृष्टि दिसनुसे ॥ निवृत्तीचे सार रामकृष्णनाम । वैकुंठ परम सर्वकाळ ॥ १४. समर्थाचे घरी काही उणे नसल्याने आम्हांस नामप्रेम द्यावें । इतकेंच आम्ही मागतो. न जाणती कळाकुसरी गोपाळा । नाम है मंगळा अच्युताचें ॥ हेचि मज द्यावे सप्रेम आपुले। ध्यातुसे पाउले एवढ्यासाठी॥ न मागे नेणे काहीं यावीण आणिक । सप्रेमाची भूक तृष्णा करी॥ सामर्थ्याचे घरी काही नाही उणे । अखंड प्रेम देणे कृष्णनामीं ॥ इतुकेचि दातारा पुरवी माझे कोड । यावीण काबाड भार नेघे॥ निवृत्ति सप्रेम संजीवनी मूळ । स्मरतां काळवेळ नाहीं नामीं ॥ । १५. ज्याच्या मुखांत नाम वसतें तेथेंच हरि असतो. नाम मुखीं सदा तोचि पैं भाग्याचा। तयासीयमाचा धाक नाहीं॥ रामराम हरि सर्वकाळ वसे । तेथेंचि वसे बसे हरि ॥ हरिध्यान वसे अखंड पैं सर्वदा । न पवे तो आपदा इये जनीं। निवृत्ति समता हरिभजन करी । सर्वत्र कामोरी ऋद्धिसिद्धि ॥ १६. ज्याच्या मुखांत नामाची सरिता आहे तो एकच पुरा घट आहे असे समजावें. ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि येकु पुरता घटु जाणा। नामाचेनि बळें कळिकाळ आपणां । ब्रह्मांडायेसणा तोचि होय॥ न पाहे यम काळ तयाकडे अवचिता नामाची सरिताज्याचे मुखीं। निवृत्ति नामामृत उच्चारी रामनाम । नित्यता परब्रह्म याचे घरीं ॥ १ अंधाराचे पडळ. २ सृष्ट, अर्थात् विनाशी, खोटें. ३ कलाकौशल्य. ४ दुःख. ५ दासी. ६ अमृताची नदी. ७ एवढा. ८ चुकून.