पान:संतवचनामृत.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६१० १०. परापवाद व परनिंदा ऐकतांच निजमौन्याने कृष्णजप करावा. परापवाद कानी परनिंदा झणी । ऐकतां निजमौनी कृष्ण जप ॥ हरि हरि म्हणे नायके ते मातु द्वैत तया आंतु नेघे बापा ॥ दुजियाची निंदा अपवाद सदा । वाचेसी गोविंदा जप करी ॥ निवृत्ति तत्पर नाइके ते शब्द । नित्यता गोविंद जपतसे ॥ ११. "विष्णुपणे लोपों भान तुझें." अपशब्द कानी पडतांचि द्वैत । नाम है अच्युत नये रया ॥ परनिंदा पीडा करितांचि मूढा । पडिलासी वेढा योनिमाळे ॥ आपस्तुति नको आपपर ऐको । विष्णुपणे लोपों भान तुझें ॥ निवृत्ति सत्वर द्वैत हे निरसी। अद्वैतसमरसी दिधला असे ॥ १२. देहांत आत्मा निरंतर नांदत असतां इकडे तिकडे कां धांवतोस ? देहाच्या दीपकी एकी वस्तु चोख। असोनियां शोक कां करितोसि॥ देहभरी आत्मा नांदे निरंतर | असता हा विचार कां धांवतोसी। तुझे तूं पाहीं आहे ते घेई । एकरूप होई गुरुखूणे ॥ निवृत्तीचे सार हरिरूप सदा । नित्य परमानंदा रातलाँसे || १३. जंव काळ पाहुणा आला नाही तंववरच नामस्मरणाचा वेग करा. संसारभ्रमे भ्रमले हे जीव । नेणती हे माँव रोहिणीची ॥ जाईल हा देह सरेल आयुष्य । आपेआप भविष्य उभे राहे ॥ वेगु करा आधी रामनामचिंतना जंव नाहीं पाहुणा काळ आला॥ १ दुसऱ्याचे दोष. २ कदाचित्. ३ गोष्ट. ४ बापा. ५ जन्माची परंपरा. ६ ज्योत. ७ रंगणे, रमणे. ८ माया, भास. मृगजळ.