पान:संतवचनामृत.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवृत्तिनाथांचा उपदेश. २ निवृत्तिनाथांचा उपदेश. ७. अनुभवाच्या गांवांत ज्ञान हे फळ असून विज्ञान हा वृक्ष आहे. अनुभवाच्या गांवीं ज्ञान हेचि फळ । विज्ञान केवळ वृक्ष तया ॥ साधनी स्वानुभव अनुभवीं अनुभव । ब्रह्माची राणीव आम्हां घरीं॥ रिकामा बरळु नस खेळेमेळे । ब्रह्माची कल्लोळे भोगितुसे ॥ निवृत्ति सरळ निरसले अज्ञान । सर्वत्र संपन्न आत्माराम ॥ ८. जेथे शुद्ध वासना आहे तेथेच वैकुंठ आहे. देही देव आहे हे बोलती वेद । परि वासनेचे भेद न दवडती॥ वासना पैं चोख तेथेचि वैकुंठ । भावेंचि प्रगट होये जना॥ न लगती सायास करणे उपवास । नाममात्रे पाश तुटे जना॥ निवृत्ति पहातु देहामाजी प्रांतु । देवचि दिसतु सर्वोघंटीं॥ . ९. दया, शांति, करुणा हीच योग्याची चिन्हें होत. सर्वभूती दया शांति पैं निर्धारी । तो योगी पैं सार्चार जनीं इये। नलगे मुंडणे काया हे दंडेणे । अखंड कीर्तने स्मरे हरी॥ शिव जाणे जीवीं क्षरला चैतन्य । हे जीवीं कारुण्य सदाभावी ॥ गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे। एकुचि स्वरूप आत्मा तैसा॥ उगवला केळी उल्हासु कमळी । तैसा तो मंडळी चंद्र देखा ॥ निवृत्तिमंडळ अमृत सकळ । घेतले रसाळ हरिनाम ॥ १ विशेष प्रकारचे, अनुभवाचें, ज्ञान. २ राज्य. ३ बडबड. ४ लाट, ५ प्रकार. ६ देव. ७ शरीर. ८ खरोखर. ९ कष्टवणे, त्रास देणे. १० कलांनी, किरणांनी.