पान:संतवचनामृत.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६३ ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भवं नाही आम्हां ॥ निवृत्तिसाधन गयनीप्रसाद । सर्व हा गोविंद सांगतुसे ॥ ४. जो प्रत्यक्ष हरि डोळ्यांस दाखवील असाच सद्गुरु करावा. सप्तपाताळे एकचीस स्वर्ग पुरोनि उरला हरि । काया माया छाया विवर्जित दिसतो आहे दुरी नाजवळीगे बाईये॥ प्रत्यक्ष हरि तो दाविपांडोळां ऐसा सद्गुरु कीजे पाहोनि । तनु मन धन त्यासी देऊनि ते वस्तु घ्यावी मागोनि गे बाईये ॥ पावाडां पाव आणी करी परवस्तुसी भेटी ऐसा तोचि । तो सद्गुरुविण मूढासि दर्शन कैचे ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये॥ एक मंत्र एक उपदेशिती गुरु ते जाणावे भूमिभारु । निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वे दावी ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये॥ ५. समकालीन संतांचा उल्लेख. सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ दिंडी टाळ घोळ गाती विठ्ठलनाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचे ॥ नरहरि विठा नाराँ ते गोणाई । प्रेमभरित डोहीं वोसंडती॥ निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे। पुंडलिकासंगे हरि खेळ ॥ ____६. खेचर व सोपान हे जणू काही परब्रह्माचे अंकुरच होत. धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचे जीवन जनक हेतु ॥ धन्य याचे कुळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे॥ याचेनि स्मरणे नाशती दारुणे। कैवल्य पावणे ब्रह्मामाजी॥ निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकुर उमटले ॥ १ नाहीसा झाला. २ संसार. ३ आत्मवस्तु. ४ सोबती. ५ वीणा. ६-७ नामदेवांच्या मुलांची नांवें. ८ नामदेवाची आई. ..