पान:संतवचनामृत.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवृत्तिनाथ. १ गुरुपरंपरा व समकालीन संत. १. निवृत्तिनाथांची गुरुपरंपरा. आदिनाथ उमा बीज प्रकटले । मच्छिद्रा लाधले सहजस्थिती॥ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनीनाथा॥ वैराग्ये तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ निद्व निःसंग विचरतां मही। सुखानंद हृदयींस्थिर जाला ॥ विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख । देऊनि सम्यक् अनन्यता ॥ निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामें ॥ . २. गुरुकृपेने संसारवृक्षाचें छेदन. सुमनाची लता वृक्षी निपजली । ते कोणे घातली भोगावया ॥ तैसा हा पसारा जगडंबर खरा । माजि येरझारा शून्य खेपा ॥ नाहीं यासी छाया नाही यासी माया।तोहा वृक्षवाया विदान करी॥ निवृत्तिराज म्हणे तो गुरुविण न तुटे । प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेतु ॥ ___३, गहिनीप्रसादाने सर्वगत आत्मा आम्हांस प्रत्यक्ष दिसतो. सर्वांघटी वसे तो आत्मा प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ विराले ते ध्येय ध्यान गेले मनीं । मनाची उन्मनी एक जाली। १ शंकर. २ संयोग. ३ काशल्य. ४ नेणारा. ५ शरीर. ६ मनरहितस्थिति.