पान:संतवचनामृत.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. २५. ज्वांस सर्वगत सदा ब्रह्म प्राप्त झाले अशा साधूंची भेट होणे मोठ्या भाग्याचे होय. वाऱ्यास आवरण घालवेल, रवि अस्तास जात असता त्यास धरवेल, पण या संतांचे महिमान कळणार नाही ( क्र. ५९ ). अशांच्या केवळ दर्शनानंच प्राण्यांस उद्धार होत असतो (क्र. ६० ). आपलें धन तस्कराने नेलें असत ज्याचे मन उद्विग्न होत नाही, आपल्या पुत्राचा शत्रूने वध केला असतांही ज्याच्या डोळ्यांस मोहाचा पाझर सुटत नाही, आपले शरीर शत्रूनें गांजलें असतां ज्याच्या शांतीचा ठेवा चुकत नाही, त्यासच या जगांत साधु या नावाने संबोधितां येईल (क्र. ६१). संसारांत आपदा कितीही असोत, असा साधु वाचेनें सदा विठ्ठल नाम गात असतो ( क्र. ६३ ), शिण्यापासून सेवा घेणे हे तो अधमलक्षण समजतो (क.६५), अशा संतांची रूपा झाल्यासच हरीचे दर्शन होईल; तुमचे हाती देव आहे तो मला एकदां दाखवा असें एकनाथ काकुळतीस येऊन संतांस म्हणतात (क.६८). संतांचे दर्शन झाल्याने आज त्रिविधतापांची बोळवण झाली, व. अनंतजन्मांचा शीण गेला (क्र. ७३ ). आज संतसंग घडल्याने भाग्याचा उदय झाला, व त्यामुळे आनंदाचे पूर लोटले, असें एकनाथ म्हणतात (क्र. ७r ). हे संत मेघापरीस उदार असून आपले सर्व मनोगत पुरवितात; त्यांस शरण गेल्यास ते सर्व भार चालवितात; सर्व लिगाडे व उपाधि सोडवून आपणांमध्ये सरते करतात; व काळाचा घाव अंगास लागणार नाही असे करतात (क्र. ७६ ). हे संत मायबापांपेक्षा श्रेष्ठ होत; कारण मायबाप जन्म देतात, व हे संत जन्म चुकवितात (क्र. ८१). त्यांचे जे सोयरे होतात त्यांस ते यातिकुळाविरहित करितात (क्र. ८६). अशा भक्तांच्या देहांत देव सदा वसून त्यांस धर्म व अर्थ अर्पण करतो (क्र. ८७ ). देवावर भार घातला असता तो निर्धाराने योगक्षेम चालवितो, यांत शंका नाही (क्र. ८९). आपले सर्व अंग वोढून तो भक्तपीडा निवारण करितो ( क्र. ९० ). भक्तांच्या अगोदर देव मुळीच नसल्याने भक्त वडील व देव धाकुटा असें म्हणण्यास हरकत नाही (क. ९).जो देवाची निंदा करितो, व संतांस सन्मानतो,त्यांस मुक्ति प्राप्त होते; कंसाने रुष्णाचा द्वेष केला, पण नारदास त्याने सन्मानिले, म्हणून तो सायुज्यसदनास गेला (क्र. १०१ ). भक्त हेच देवाचे आराध्यदैवत होत, असें श्रीरुष्ण उद्भवास खात्रीने सांगतात ( क. १०६). माझा शरणागत केविलवाणा दिसल्यास त्याची लाज मलाच आहे असें देव सांगतात (क्र. १०७ ). धर्माची वाट सोडून अंधर्म ज्यावेळेस शिगेस चढतो त्यावेळी संतांस अवतार घ्यावा लागतो, नाना पाषांडमताचें