पान:संतवचनामृत.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. संसारांत असावें (क. ३० ). मन मागेल ते त्यास देऊ नये ( क. ३२). मनामागे जाणारास मागे थोर थोर दगे झाले आहेत (क्र. 3r). इंद्रचंद्रांस ज्याने दरारा लाविला, ज्याने नारदास धडक मारली, ज्याने विश्वामित्रासारख्या ऋषीस नाडविले, अशा एडक्या मदनास ज्याप्रमाणे शुकदेवाने ध्यान करून बांधून टाकिलें, त्याप्रमाणे आपण त्यास गुरूचे चरणी आणून बांधावें ( क्र. ३५). देवाची आठवण ठेवणे हेच परब्रह्मस्वरूप; देवास विसरणे हाच भवभ्रम आहे; असे एकनाथ म्हणतात (क. ३६ ). ज्याच्या पोटांत भाव नाही त्यास नाम ही एक थट्टाच वाटते, पण अनुभव आला असतां मात्र त्याच्या संसाराच्या खेपा चुकतात (क्र. ४०). नामरूपांस मेळ न घालतां उगाच वाचेचा गोंधळ करण्यांत काय अर्थ आहे (क. ४१ ) १ जो नामधारक आहे, त्याची योग्यता सहस्र ब्रह्मवेत्त्यांसही येणार नाही ( क. ४३ ). आपण देवाचें चिंतन केले असतां देव आपलें व्यंग पडूं देत नाही.( क्र. ४६ ). ज्यास प्रेम नाही असा ज्ञानी एकाद्या शृंगारलेल्या रडेप्रमाणे दिसतो ( क. ४८). भक्ति हे मूळ असून, वैराग्य हे त्याचे फूल, व ज्ञान हे फळ आहे ( क. ४९ ). नित्य कीर्तन करीत असतां रोज नवा नवा रंग ओढवतो, व श्रोता व वक्ता हे दोघेही देवरूपच होऊन जातात; वैष्णवांनी आल्हादानें हरिनाम गर्जले असता त्याचा घोष गगनात मावत नाही, हरीचें नाम गाइल्याबरोबर इंद्रियें आपआपला सर्व व्यापार विसरून जातात (क. ५१ ). आपण ज्याचे घरी कीर्तन करावे त्यांवर कोणतेही ओझें घालू नये; पणे भक्षूनही राहण्यास हरकत नाही (क. ५६ ). संतांची परमपवित्र चरित्रे आदरबुद्धीने वर्णन करावी, सज्जनवृंदांस मनोभावानें नमन करावे, संतसंगतीमध्ये अंतरंगांत नाम घेत जावे कीर्तनाचे रंगांत देवाजवळ सुखाने डोलावें; भक्तिज्ञानावांचून दुसऱ्या गोष्टी करूं नयेत;व ज्याच्यायोगें अंतरंगांत श्रीहरीची मूर्ति ठसावेल असें कीर्तन करावे (क्र.५५) श्रवणभक्तीनें परीक्षिति उद्धरून गेला आहे; कीर्तनाने नारद तरून गेला; हरिनाम. घोष करून प्रल्हाद पावन झाला, पादसेवनभक्ति करून रमा उद्धरून गेली; अङ्कराने वंदनभक्ति केली; मारुतीने दास्यत्व करून आपला उद्धार घेतला, अर्जुनाने सख्यभक्तीने रुपास आपला ऋणी केलें व बळीने आत्मनिवेदनभक्ति करून देवास आपलें शिर समर्पिलें. या नाना प्रकारच्या भक्तीपैकी कोणतीही भक्ति केली असता ती उद्गरागतीस खात्रीने कारण होईल यांत संशय नाही (क्र. ५८)..