पान:संतवचनामृत.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. खंडन करून, कर्मठतेचे तोंड ठेचण्याकरितां, व जडजावांचा उद्धार करण्याकरितां, संतांचा अवतार आहे. अशा संतांची देवही सर्व प्रकारें सेवा करितो. एकनाथाचे घरीं सडासंमार्जन करून गंध उगाळून देणा-या श्रीखंड्याच्या रूपानेच देवानं एकनाथाची सेवा केली असे म्हणण्यास हरकत नाही ( क्र. ११२). अशी संतसंगति धरल्याने माझें जन्मास आल्याचे कार्य सिद्धीस गेलें असें एकनाथ सांगतात (क्र. ११३). २६. एकनाथांनी आपल्यास साक्षात्कार कसा झाला याबद्दल आपल्या अभंगांत फार उत्तम रीतीने वर्णन केले आहे. प्रथम अष्टसात्त्विक भाव उत्पन्न झाल्यावांचून देव रुपा करीत नाही, असें एकनाथांनी म्हटले आहे. अंगावर रोमांच उभे राहणे, शरीरावर स्वेदाच्या कणिका उत्पन्न होणे, सर्वांगांस कंप सुटणे, नेत्रांतून अश्रु वाहणे, अंतःकरणांत आनंदातिशय होणे, कंठ प्रेमाने दादून येणे, वाचेस मोन्य पडणे, व नासिकांवाटें दीर्घ श्वासोच्छास निघणे हे अष्टसात्त्विक भाव उत्पन्न झाल्याचिन सत्त्वाची परिशुद्धि होत नाहीं (क्र. ११४). मी कानावाटे नयनास येऊन शेवटी नयनापुढे नयनरूपाने परिणमलों असें एकनाथ म्हणतान (क. ११५). एकाजनार्दनास सर्वांगीच डोळे झाल्याप्रमाणे त्यांची स्थिति साली, व तिन्ही अवस्था सोडून ते अर्धचंद्राच्या चांदण्यांत वागू लागले, असें ते लिहितात (क्र. ११६). हृदयात चिन्मय प्रकाश उत्पन्न होऊन एकनाथांची भ्राति निरसली ( क्र. १५८). जिकडे तिकडे पहांट होऊन पृथ्वी लखलखाटाने भरून गेली, असें एकनाथांनी लिहिले आहे (क्र. ११९). त्या बोधभानूस सायंप्रातर्माध्यान्ह नाहीसे होऊन, सर्वदा उदयच असल्याने, अस्तवणे अस्तास गेलें, व त्यामुळे पूर्वपश्चिमभाव उरला नाही ( क्र. १२० ). जळाच्या आंत बुडी दिल्यावर तेथेही चिन्मात्र दिसल्याने जळसुद्धा पावन होऊन गेलें, असें एकनाथ म्हणतात (क्र. १२१). स्वयंप्रकाशांत स्नान करून सर्वभूतनमनरूपी संध्या एकाजनार्दनांनी केल्यावर (क्र. १२२ ), त्यांचा संदेह नाहीसा होऊन आत्माराम त्यांच्या हृदयाकाशपालखीत विराजमान झाला (क्र. १२३). एकनाथांनी नामाची घनगर्जना केल्याबरोबर जनार्दनसागरास पूर आला असें ते लिहितात (क्र. १२). देवाचा चमत्कार असा की तो लन लागल्याबरोबर विटाळावांचून पोटास आला, व इतर पाहणा-यांस सुद्धा त्याने पिसें HELP REP STREET