पान:संतवचनामृत.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. होऊन ( क. १४), पुढे हंसस्वरूप दिसले असता, त्यांमध्ये रिघून आपले स्वरूप • पहावें; देहाचा जो स्वामी तो अविनाशरूपाने प्रगटतो (क्र. १६ ). यापुढे जो बोलेल त्यास पतन होईल असें जनार्दनस्वामी सांगतात. . २४. एकनाथांची जनार्दनांबद्दलची गुरुभाक्त ज्ञानेश्वरांच्या निवृत्ति नाथांबद्दलच्या गुरुभक्तीइतकीच खडतर आहे. परमार्थ साधावयास मातापिता ही कोणी उपयोगी पडत नसून केवळ गुरूचंच साह्य होते असे एकनाथ म्हणतात ( क्र. 3). साधनाच्या कोणत्याही आटी न करवितां जनार्दनस्वामीनी माझ्या हृदयसंपुष्टांतच मला देव दाखविला ( क्र. ६ ); व कामक्रोधादिविकारांचा अंधार पळवून लावून माझ्यापुढे विबिंबाप्रमाणे प्रकाश केला ( क. ७). गुरु हाच परमात्मा परेश असा माझा दृढ विश्वास असल्याने देव माझा अंकित होऊन राहिला आहे, असे एकनाथांनी म्हटले आहे ( क. ९ ). या विषयरोगाचे सामर्थ्य असें चमत्कारिक आहे की, परमार्थ हा गोड असूनही त्यामुळे तो कडू वाटतो (क्र. १०). पर. मार्थाची प्राप्ति होण्यास मुख्य अनुताप झाला पाहिजे; अनुताप झाल्यास देव जवळच असतो (क्र. १२). गुरुचे ठायीं अगर परमार्थाचे ठायीं अविश्वास उत्पन्न होणे हाच सर्व दोषांचा मुकुटमाण आहे (क. १४). परद्रव्य व परनारी या दोहीं. या विटाळ करून न घेणे हीच परमार्थमार्गातील दोन मुख्य साधने होत (क.१७). एका स्त्रीमुळेच परमार्थाचा नाश होतो, त्यांत धनलोभाची भर पडल्यास मग अनर्थ विचारावयासच नको ( क्र. २४). अदृष्टाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे) देवाची रुपा झाल्याखेरीज अदृष्टाचे वर्चस्व कमी होणार नाही, भांडारगृहांत ठेवि. लेला कापूर उडून जातो, समुद्रांत तारुं बुडतें, ठक एकांतांत येऊन मुलाम्याचे माणे देऊन जातात, पेवाआंत पाणी भरून धान्याचा नाश होतो, परचक येऊन तळघरे फोडून द्रव्य घेऊन जातात, गोठ्यांतच शेळ्या, गाई, म्हशी, यांवर रोग पडून त्यांचा संहार होतो, भूमीमध्ये निक्षेप ठेविला असता तो धुळीस मिळून जातो, असे अदृष्टाचे नानाप्रकारचे चमत्कार आहेत (क. २८), फुल गेल्यावर फळ उत्पन्न होते, पण तेही सर्वच मासतें, प्रेत मेणारे किती ओझे हो म्हणून ओरडतात, पण तेही लौकरच प्रेतावस्थेस जातात; मरण असा शब्द उच्चारला असतां धुंकणारे तोंड लौकरच मसणांत जळून जातें, एका देवास शरण गेल्यावांचून या काळापासून आपली सुटका होणारं माही (क. २९). पांथस्थ ज्याप्रमाणे रात्री घरास येतो, व प्रातःकाळी उठून जातो, त्याप्रमाणे आपण वा