पान:संतवचनामृत.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. असतांच परमार्थ कसा करावा हे त्यांनी जसे आपल्या उदाहरणाने सर्व लोकांस शिकविलें, त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही संतानें शिकविले नाही असे म्हटले. असतां अतिशयोक्ति होईल असे वाटत नाही. २३. आतां आपण प्रथम भानुदास व जनार्दनस्वामी यांच्या अभंगचर्चेकडे वळू. भानुदासांनी पंढरपूर ही एक निळांमाणकांची खाणीच आहे असे म्हटले आहे; जरी हजारों लोकांनी ती आजपर्यंत लुटली आहे तरी आगरांत जशीच्या तशीच ती शिल्लक आहे असे ते म्हणतात (क्र. २ ). भानुदासांस ज्यावेळी विजयानगर येथे राजाने हार चोरला ह्मणून मुळी द्यावयास नेले त्यावेळी त्यांनी केलेला अभंग फार हृदयद्रावक आहे. जरी आकाश तुटून वर पडलें अगर ब्रह्मगोळ भंगास गेला, अगर त्रिभुवन वडवानळाने खाऊन टाकिलें, तरी मी तुझीच वाट पाहीन असे ते विठो बांस ह्मणतात. मी तुझा नामधारक असल्याने तूं मला दुसऱ्याचा आकत करूं. नकोस; सप्तसागर जरी एकवटले, पृथ्वी जरी त्यांत विरून गेली, पंचमहाभूते जरी प्रळयांत सांपडली, तरी मी तुझी संगति सोडणार नाहीं; कोणतेही भयंकर विघ्न जरी येऊन वर आदळले तरी प्रतिव्रता जशी प्राणेश्वरास सोडणार नाही, तसे मी तुझें नाम सोडणार नाही ( क्र. ६); अशी करुणा भाकल्यावर ज्याप्रमाणे कोरड्या काष्ठास अंकुर फुटावे, त्याप्रमाणे त्यांच्यापुढे देवाचे दर्शन होऊन त्यांचं संकट निरसलें असें ते सांगतात (क्र. ७). जनार्दनस्वामींनी औदुबरास जाऊन अंकलकोप येथें नृसिंहसरस्वतींचा उपदेश घेतला असें मागे आम्ही लिहिलेच आहे ( क्र. २ ). तूं जर आम्हांवर रुपा करणार नाहीस, तर आम्ही कोणत्या देवाचे आराधन करावे, असे ते आपल्या गुरूस विचारतात (क्र. :). आपल्या गुरूचें नामस्मरण केले असतां आपण सद्गुरुरूपच होऊन जातो असे ते म्हणतात ( क्र. ६ ). त्यांनी एकनाथास जो उपदेश केला त्याचे येथे थोडक्यात सार द्यावयाचे आहे. लटक्या प्रपंचांत न गुंततां तूं पंढरीचा सोपा मार्ग पतकर असे ते एकनाथास सांगतात (क्र. ५). ज्ञातीचा विचार न करता, अन्न परब्रह्म असल्याने (क्र. १७ ), सर्व संतांस सरसकट अन्नदान दे (क्र. ९). तुझें मन शुद्ध झाल्यास बसल्या ठायींच तुला देव दिसेल ( क्र. १२).एकेक चक्र आकाशायेवढे दिसून त्यांमध्ये मोत्यांची चौकडी दिसेल; मण्यांच्या ज्योतीचा प्रकाश होऊन तेलावांचून दीप्ति पाजळतील ( क्र. १3). प्रथम समाधि निबिड साकार