पान:संतवचनामृत.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६. संतवचनामृत. ‘अशी चोखामेळा सदेव दवंडी पिार्टतो असे त्याने म्हटले आहे (क्र. ६) जना"बाईचे अभंग फार प्रेमळ आहेत, व त्यांत एक प्रकारचे तेज आहे. पतंग सुखाऊन दीपावर उडी घालील तर तो अधोगतीस मात्र जाइल, असें जनाबाई म्हणतात (क्र. १ ). शूरांचे शस्त्र, अगर हत्तीच्या गंडस्थळावरचे मोती, सिंहाचे नख, अगर पतिव्रतेचे स्तन ही जशी प्राण गेल्यासही हाती लागणार नाहीत, त्याप्रमाणे अहंकारत्याग झाल्यावांचन देव मिळणार नाही असे जनाबाई म्हणतात ( क्र. ४). आपण कायावाचामन सद्गुरूस देऊन त्यापासून वस्तु मागन घ्यावी; जो आत्मा प्रगट दाखवील तोच सद्गुरु होय असें जनाबाई म्हणतात ( क. ५). भक्ति ही : इंगळाच्या खाईप्रमाणे,विषाच्या ग्रासाप्रमाणे, अगर खड्गाच्या धारप्रमाणे तीक्ष्ण आहे असें जनाबाईचे म्हणणे आहे (क्र.६). हृदय बंदिखाना करून ज्यावेळी विठ्ठलास मी आंत कोंडिलें, व सोहं शब्दाचा मारा केला, त्यावेळी विठ्ठल काकुळतीस आला असें नामदेवांप्रमाणेच जनाबाईनी म्हटले आहे ( क. ११). नव-यामुलाबरोबर वहाड्यांसही ज्याप्रमाणे पुरणपोळीचे जेवण मिळते, त्याप्रमाणे नामदेवाबरोबर मलाही देवाची प्राप्ति झाली असें जनाबाई सांगतात (क्र. १२). रक्त, श्वेत, श्याम, नीळ वर्णांच्यावर भ्रमरगुंफेत मी देवाचे दर्शन घेतलें. असें त्या सांगतात (क्र. १५). वामसव्य, खालीवर, सर्वत्र देवाचे मला दर्शन झाले ( क. १६ ). स्वरूपाचा पूर डोळ्यावर आल्याने डोळ्यांस एकदम झापड पडली ( क्र. १७). माझा कान डोळा झाला, व बायको निबर असतांनाही भ्रतार तान्हा बनला असे नवल वर्तन गेलें (क्र. २० ). सहजगत्याच जरी मी द्वाराकडे पाहिले तरी तेथे विठ्ठल उभा आहे असे मला दिसू लागले (क्र. २२. ). आता मी देव खाते, देव पिते, देवावर मी शयन करिते, असें जनाबाई म्हणतात. ( क्र. २३) सूर्य आणि रश्मि ही जशी दोन नाहीत, त्याप्रमाणे देव आणि भक्त यांमध्ये भेद नाही, असे जनाबाईंचे म्हणणे आहे (क.२८). सेना न्हावी याने देवाच्या प्राप्त्यर्थ गिरिकाननास जाण्याचे कारण नाहीं असें सांगितले आहे. गिरिकाननास जाल तर विभांडकाप्रमाणे रंभेकडून नागवून मात्र घ्याल असे तो म्हणतो ( क्र. ४ ). सेनान्हावी याने आपण वारिक असून बारीक हजामत करितो असे सांगितले आहे. विवेकआरसा दाखवून आम्ही वैराग्याचा चिमटा हालवितों, शांतिरूप उदक डोईस चोळून अहंकाराची शेंडी पिलितों, भावार्थाच्या बगला झाडून कामक्रोधनखें काढितों, चारी वर्णास आम्हांवांचन गत्यंतरच नाही, आमच्या आधारानेच ते अजिवंत राहतात, असें सेनान्हावी याने म्हटले आहे (क्र. ११). कान्होपात्रा इला: