पान:संतवचनामृत.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - प्रस्तावना केले ( क...). सांवतामाळी यांस आपल्या हीनयातीबद्दल थोडीशी जास्त जाणीव होती असे दिसते (क्र. 3). एकापरीने ही हीनयाती आली, व त्यामुळे माझी महंती वाढली नाही, हे बरेच झाले असें ते सांगतात (क्र. २ ).. आपण नेहमी देव ठेवील त्या स्थितीत आनंदाने रहावे; कधी हत्तीवर बसावें, तर कधी पायाने चालत जावे; कधी घरांत धान्य नाही, तर कधी द्रव्य कोठे ठेऊ व कोठे न ठेऊ असे होऊन जावे; कधी स्मशानांत जाऊन एकटे रहावे, तर कधी सद्गुरूची कृपा होऊन सांवत्याच्या बापाचे दर्शन घ्यावे, असे ते म्हणतात (क्र.). नरहरि सोनारानें “गैबीनाथ" असे आपल्या गुरूचें नांव सांगितले आहे (क्र. २ ). जसा एकादा चितारी भिंतीवर चित्रे काढितो व लगेच ती पुसून टाकितो, जशी पोरें एकादा खेळ खेळतात व शेवटी तो मोडून टाकितात, त्याप्रमाणेच है जग आहे असें नरहरि सोनार सांगतो ( क्र. १ ). अनाहत ध्वनीने माझें मन मोहून गेलें आहे असेंही तो सांगतो ( क्र. ). शेवटी, आपण सोना-. राचा धंदा परमार्थात सुद्धा कसा चालविला याचें तो उत्तमरीतीने. वर्णन करितो. देह हीच कोणी एक शेगडी, व अंतरात्मा हेच कोणी एक सोनें होय. त्रिगुणाची मूस करून मी त्यांत ब्रह्मरस ओतिला; जीवशिवांची फुकी करून रात्रंदिवस ठोकाठोकी केली; विवेकहातोडा हाती घेऊन कामक्रोध पूर्ण केले; मन. बुद्दीची कात्री घेऊन त्याने रामनाम सोने चोरिलें, व ज्ञानताजव्यांत घालून त्या दोन्ही अक्षरांचे वजन केले, तर ते अमूल्य भरलें असें नरहरि सोनार सांगतो. ( क्र. ५). एकदां चोखामेळ्यास विठोबाचा हार प्राप्त झाला असता त्यास बडव्यांनी मारिले, तेव्हां मी तुझ्या दारीचा कुतरा आहे मला मोकलू नको, असे त्याने देवास विनविलें (क्र. २). बाहेरची पंढरी व विठ्ठल पाहणे हे फारसे मोठे काम नव्हे; माझा देह हीच कोणी पंढरी असून अविनाश आत्मा हाच विठ्ठलरूपाने त्यांत दिसत आहे; त्याचे दर्शन झाल्याने मी त्याचे पायीं जडून गेलो असें चोखामेळा सांगतो (क्र. :). ऊस वांकडा असला तरी त्याचा रस जसा वांकडा होत नाही, . अगर कमान वांकडी असली तरी बाण जसा वांकडा होत नाही, त्याप्रमाणे चोखा वांकडा असला तरी त्याचा भाव वांकडा नाही हे लोकांनी ध्यानात ठेवावे (क्र.). पुत्र होणार असेल तर तो संत झाल्यासच त्याचा उपयोग; कन्या होणार असेल तर ती मिरामुक्ताबाईप्रमाणेच व्हावी, असे न झाल्यास त्यापेक्षा निःसंतान बरें असें चोखामेळा म्हणतो. ( क्र. ५). खटनटांनी पंढरीस येऊन शुद्ध होऊन जाकें