पान:संतवचनामृत.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• प्रस्तावना. ज्यावेळी बादशहाचे बोलावणे आले, त्यावेळी विषयध्यासाने इंद्राअंगीही भगें पडली, व भस्मासुर भस्म झाला, अशा अर्थाचा तिनें एक अभंग केला (क. १); व सिंहाचे खाय जर जंबूक नेईल तर त्याची लाज कोणास असा भगवंतास प्रश्न करून, तिने देवास आपलें बीद जतन कर असें बिनविलें, व आपला देह देवास अर्पण केला (क्र. ३). . एकनाथादि संत. २१. महाराष्ट्रसंतांच्या इतिहासात पहिला काल जसा ज्ञानदेवादिकांचा, क दुसरा जसा नामदेव व तत्कालीन संतांचा, तसाच तिसरा काल म्हटला म्हणजे एकनाथादि संतांचा होय. एकनाथांचे पणजे भानुदास हे पैठण येथे शके १९७० मध्ये जन्मले. हे दामाजीपंतांचे समकालीन असावेत असे दिसते. कारण दामाजीपंतांचे वेळी जो दुष्काळ पडला तो शके १७८० अगर १३९० चे सुमारास पडला असावा असे दिसते. लहानपणापासूनच भानुदासांस सूर्याची उपासना होती, व पुढे हे विठ्ठलसांप्रदायाचे एक मोठे अध्वर्यु बनले. मुसलमानांच्या स्वान्यांपासून विठ्ठलमूर्तीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने म्हणा, अगर आपली राजधानी जी विजयानगर तीस शोभा व महत्त्व आणण्याच्या उद्देशाने म्हणा, तेथील राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ति पंढरपुराइन हंपी येथे नेली; व तेथें हल्ली में विजयविठ्ठलाचे देऊळ दाखविले जाते त्यांत त्या मूर्तीची स्थापना केली. पुढे पंढरीच्या भक्तांच्या आग्रहामुळे व आपल्याही विठ्ठलभक्तीच्या आतुरतेने भानुदास विजयानगरास गेले व तेथून त्यांनी आपल्या भक्तीमुळे कृष्णराय याचे मन आपल्याकडे वळवून घेऊन ती मूर्ति पुनः हंपीहून पंढरपुरास परत आणली. भानुदास यांनी शके १४३५ मध्ये देह ठेविला. एकनाथांचे गुरु जे जनार्दनस्वामी त्यांचा जन्म चाळिसगांव येथे शके १४२६ मध्ये झाला. त्यांचे लक्ष प्रथम परमार्थाकडे नव्हते. पण उपरति होऊन त्यांस नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह औदुंबरनजीक अंकलकोप येथे झाला असावा असे दिसते (क्र. २). याच नृसिंहसरस्वतींनी विजापूर येथील बादशहास रोगापासून मुक्त केल्याने त्यांचे देऊळ त्या बादशहाने विजापूर येथे किल्ल्यांत आपल्या अगदी राजवाड्यानजीक बांधले, ते अद्याप तेथे पहावयास सांपडते. वाडी, औदुंबर, व गाणगापूर ही क्षेत्र या नृसिंहसरस्वतींचीच होत. जनार्दनस्वामी जरी दत्तोपासक असावे असे दिसते, तरी त्यांनी एकनाथास “ पंढरीचा सोपा मार्ग पतकर " . असेच सांगितले आहे. प्रपंच व परमार्थ यांची गुरुशिष्यांनी म्हणजे जनार्दनस्वामी . .