पान:संतवचनामृत.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. शब्द ते आतां बोलूं लागले, व खेचरदात्याच्या कृपेमुळे आपल्या हाती सर्व सत्ता आली म्हणून त्यांस आनंद झाला (क्र. ४७).. १६ आतां आपण नामदेवांची शिकवण कशी होती याचा थोडक्यात विचार करूं.. नामस्मरणाचे महत्त्व नामदेवांनी जितकें गायिलें आहे तितकें इतर संतांनी क्वचितच गायिलें असेल. माझ्या मुखांत तुझ्या नामाचे खंडण झाल्यास माझी रसना शतधा विदीर्ण होवो; तुझें रूप माझ्या दृष्टीस न पडल्यास माझे डोळे उन्मळून निघोत, असें नामदेवांनी देवाजवळ मागितले आहे (क्र. ४९). अनुभवाने, भावाने; अगर कपटाने कसेंही नाम वाचेस आले असतां चालेल (क. ५१); कारण अठरा पुराणांच्या पोटांत नामावांचून दुसरी गोष्टच सांगितली नाही (क. ५५.).. शेतास थोडे धान्य नेऊन ज्याप्रमाणे गाडाभर परत आणितात, त्याप्रमाणे केवळ नामस्मरणाने देवाच्या प्राप्तीइतका मोठा लाभ होतो (क्र. ५८). नामस्मरणापुढे अग्नीचे सामर्थ्य चालत नाही (क्र. ५९ ). नामस्मरणानं जिभेवरचे असत्याचे मळ धुवून जातात ( क्र. ६१), व सर्व सत्ता प्राप्त होते (क्र. ६१). देव लपला तरी आपलें नाम तो कोठेही नेत नसल्याने नामस्मरण केले असतां देवास. अवश्य यावेच लागते (क्र. ६६). देह गेला तरी बेहत्तर, पण नामाचे वर्म सोडूं नये (क्र. ६७). प्रेमयुक्त नामस्मरण करणे ही कांही लहान गोष्ट नाही. चंद्रसूर्याची चित्रे काढली तरी त्यांत प्रकाश भरतां येत नाहीं (क्र. ७५) हातांत विणा व मुखांत हरीचें नाम धरून अन्नउदक सोडून देवाचें ध्यान लागले असतां दवाचे दर्शन होईल (क्र. ७७), व काळ देहास खावयास आला असतां असा भक्त आनंदाने गाईल व नाचेल (क्र. ८०)... १७. नामस्मरणाप्रमाणेच इतर गोष्टींबद्दलही. नामदेवाचा उपदेश फार विचारणीय आहे. इंद्रिये सर्वांगसाजिरी असेपर्यंतच हरिकथेस आपण सादर व्हावे (क्र. ८१ ). संसार करीत असतां देवाची प्राप्ति झाली असती तर सनकादिक संसार सोडून बाहेर जाते ना ( क्र. ८३ ). वावडी दूरच्या दूर उडत असतां तिजकडे वावडी उडविणारा जसे लक्ष ठेवितो, त्याप्रमाणे सर्वेश्वरावर लक्ष ठेवून कोणताही व्यापार करण्यास हरकत नाही ( क्र. ८५). दगडाचा देव व मायेचा भक्त यांचा संदेह फिटणे शक्य नाही, अशा प्रकारचे देव तुरुकांनी फोडले तरी ते ओरडत रडत नाहीत; अशी लोखंडमय दैवते मला दाखवू नकोस. असें नामदेव देवास म्हणतात (क्र. ९४.). सजीव तुळस सोडून निर्जीव दगडाची पूजा का