पान:संतवचनामृत.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना... दूर राहतील; देहगृहाची कामिनी तर भवनांतच साहील; मी मात्रः अमीबरोबर जळून जाईन (क्र. २४). या कारणामुळे डोळ्यांत आसवें येऊन. बाहु उभारून हा नामदेव तुझी वाट पाहात आहे. ( क...); त्याची लाजही नाहीशी होऊन कंठांत प्राण धरून तो तुझें ध्यान करीत आहे ( क्र. ३१). शोकमोहाच्या ज्वाळा चढूंकडे झळंबीत असल्याने, व चिंतेचा : वणवा चोहीकडे पेटला असल्याने, करुणाघना, तूं अंबरांत केव्हां वोळशील असे होऊन गेलें आहे (क्र. ३२)वांसरूं जसे आपल्या खंट्याभोवती फिरते तसा मी आपल्याच भोवती फिरुन खोट्याच भावांत गंतन गेलो आहे ( क..3). माझे गुणदोष मनास मुळीच आणूं नकोस, मी अपराधांची राशिच आहे; अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत मी पातकें आचरीत आलो आहे; स्वप्नांतही तुझी भाक्त मला घडली नाही, तझ्यावांचून मला तारणारा दुसरा कोणी राहिला नाही (क्र. ३५). हैं हृदयच बंदिखाना करून तुला कोंडून ठेविल्याखेरीज तूं हाती सांपडावयाचा नाहीस; ज्या वेळेस तुला सोहं शब्दानें मार करावा त्यावेळेसच तूं काकुळतीस येशील (क्र. ३७). भक्तांचे कांहीतरी घेतल्याखेरीज देव त्यांस कांहीं देतच नाही असा देव सकाम आहे; सुदाम्याचे तीन मुठी पोहे घेतले तेव्हांच त्याने त्यास राज्य दिले; द्रौपदीचें भाजीपान घेण्याइतकेही मन हळुवार करून, नंतर त्याने तिला अन्न पुरविले (क्र. ३८). अशा रुपणाचे दारांत जाऊन काय मागावयाचे आहे ( क्र. ४०)! मढ्यापाशी हात जोडून बोलावें, तशी देवापाशी माझी स्थिति झाली आहे (क. 5९). भक्तभागवतांनी देवास थोरीव आणली, त्याचा उपकारच देव विसरला ( क्र. ११). ध्रुवास अढळपद देऊन तूं ठकविलेंस, उपमन्याची दुधाचा छंद पुरवून तूं फसगत केलीस; मी त्याप्रमाणे अज्ञान नाहीं (क्र. १२). मदमत्सरादि श्वापदें खा खा करीत मजजवळ आली असतां, व कंठास. विषयव्याळाने मिठी दिल्याने मी विषाने झळंबलों असतां, शेवटची लहरी येण्याच्या अगोदरच तूं आलास तर कांहीं आशा आहे (क्र. १५). या व इतर प्रकाराने पुढे ज्याप्रमाणे तुकारामांनी देवाशी भांडण केलें, त्याप्रमाणे नामदेवांनीही केलें. नामदेवांनी आपला सर्व जीवभाव देवापाशी समर्पिल्यावर देवाने त्यांस नामप्रेम दिले व त्या प्रेमामृतामुळे. नामदेव. तृष्ट झाले . ( क..3४). हे प्रेम त्यांच्या सर्वांगांत भरून ओसंडावयास लागल्याने ज्या शब्दांनी विठ्ठल डोलेल असे