पान:संतवचनामृत.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. करावी ( क. (५) भक्तांचे नानाविध प्रकार आहेत; एकादशी करणाऱ्या मांजराची भक्ति, ध्यानास बसलेल्या लांडग्याची भक्ति, स्वयंपाक पाहिलेल्या श्वानाची भक्तिं, पतिव्रता बनलेल्या वेश्येची भक्ति, या सर्व भक्त सोडून एका लक्ष्मपितीस शरण जाण्याचीच भक्ति करावी (क्र. ९८ ). . .. १८. संताचे मुख्य लक्षण म्हटले म्हणजे जो मानापमानरहित झाला त्यासच संत म्हणण्यास हरकत नाहीं (क्र. १०९). चित्तांतून वासना खणून काढून नामावर सर्वभावाने विश्वास टाकणे हाच वैष्णवांच्या कुळींचा कुळधर्म होय (क. ११० ). निंदास्तुति समान लेखणे हीच समाधि ( क. १११). असे संत बोधसाबण लावून मनुष्यांची अंतःकरणे ज्ञानगंगेंत निर्मळ धुतात ( क्र. ११५); व एकमेकांस सावधान करून नामाचें अनुसंधान तुटू देत नाहीत (क. ११८ ). अशा संतांचे पायांवर विश्वास टाकिल्यास देवास आपोआप भेटावेच लागते (क्र. १२१); कारण जो प्रत्यक्ष राम दाखवील तोच संत, इतर संत घेऊन काय करावयाचे (क्र. १२५) ! नामस्मरण जरी स्वतःसिद्ध असले तरी गुरूवांचून वर्म हाती येत नाही (क्र. १२.७ ). रविरश्मी धरून स्वर्गास जाता येईल, पण संतसंगतीचा पार कळणार नाही (क्र. १२८ ). कोकिळ जसा वसंतऋतूखेरीज दुसऱ्यापुढे गात नाहीं, अगर मोर जसा मेघावांचन दुस-यापुढे नाचत नाही, त्याप्रमाणे संत हे देवावांचन दुसऱ्यापुढे काकुळतीस येत नाहीत (क्र. १३०). अशा संतांनी अव्हेरिल्यामुळे मुक्तिपद दीनरूपाने वाळवंटांत हिंडते, व कोणाचाच आसरा त्यास सांपडत नाही म्हणून ते योग्यांच्या घरांत शिरतें ( क. १३१). संतांमध्ये नाना प्रकारचे खेळिये होऊन गेले आहेत. एक खेळास भ्यालेले बारा वांचे नागवेंच पळून गेलेले बाम्हणाचं पोर; एक कपाट फोडून गेलेले सहा तोंडांचे शंभूचे बाळ; एक कामव्यसनांत न सांपडलेला शहाणा हनुम्या; एक बहुतच खेळ खेळलेला यादवांचा पोर गोप्या; असे नाना प्रकारचे खेळिये या जगांत होऊन गेले आहेत, व त्यांनी आपल्या क्रीडा निरनिराळ्या रीतीने करून दाखविल्या आहेत ( क्र. १३१). १९. देवास जाणण्याची कळा ही एक निसर्गदत्त देणगी आहे असें नामदेवांचे म्हणणे आहे. मोगऱ्याचे फूल उपजल्याबरोबरच त्यास मुवास कसा उत्पन्न होतो! वनांत व्यालेल्या धेनूचें वत्स तिच्या स्तनास कोण लावितो ? त्याप्रमाणेच, सहज -