पान:संतवचनामृत.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ संतवचनामृत : एकनाथ. [ ६१४५ १४५. अहं ब्रह्मास्मि. मी तो स्वये परब्रह्म । मीचि स्वयें आत्माराम ॥ मी तो असें निरुपाधि । मज नाहों आधिव्याधि । मी तो एकट एकला। द्वैतभाव मावळला ॥ मजविण नाही कोणी । एका शरण जनार्दनीं॥ १४६. " कोहं ओह सोहं " पलीकडचा बोध. नामपाठे निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले॥ तिन्हीपरता बोध तयासि बोधिला । नामपाठे झाला शांतरूप ॥ जनार्दनाचा एका गमोनि मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥ १४७. जें जें दृष्टीस दिखें तें तें ब्रह्मरूप आहे. कैवल्यनिधान तुम्हीं संतजन । कायावाचा मन जडले पायीं ॥: सर्वभावे दास अंकित अंकिला । पूर्णपणे जाहला बोध देहीं । जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप । एकाजनार्दनीं दीप प्रज्वाळिला॥ १४८. सर्वं खल्विदं ब्रह्म । मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥ हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥ मीच गंध मीच अक्षता । मीच वाहे मीच पुती ॥ मीच धूप मीच दीप । मी माझे देखे स्वरूप ॥ मीच माझी करी पूजा । एकाजनार्दनीं नाहीं दुजा॥ १ चिंता, व शारीरिक रोग. २ मोक्षाचा ठेवा. ३ साहित्य.