पान:संतवचनामृत.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१७ ६ १४४ साक्षात्कार. ब्रह्मज्ञानाची ते उघडली पेटी । जाहले पोटी शीतळ जाणा ॥ एकाजनार्दनी ज्ञानाचे ते ज्ञान । उघड समाधान जाहले जीवा ॥ . १४२. एकानेक जनार्दनाच्या ठायीं एका एकपणे जडून गेला. पाहों गेलो देवालागीं । देवरूप जालों अंगीं ॥ आतां मीतूपणा ठाव । उरला नाही अवघा देव ॥ सुवर्णाची झाली लेणीं। देव झाला जगपणीं ॥ घटीं मृत्तिका वर्तत । जगी देव तैसा व्याप्त ॥ एकानेक जनार्दनीं । एका जडला एकपणे ॥ १४३. आता मी पूजा करूं गेल्यास माझी मीच सेवा केल्याप्रमाणे होईल. देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो॥ आतां कैसेनि पूजू देवा । माझी मज होतसे सेवा ॥ . अत्र गंध धूप दीप । तेही माझंचि स्वरूप ॥ एकाजनार्दनीं करी पूजा । तेथे पूज्य पूजकु नाही दुजा ॥ १४४. जोपर्यंत आपली आपण पूजा करण्याची राहाटी नाही ___ तोपर्यंत आपली पूजा करणाऱ्यापेक्षां अज्ञान बरा. आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहाटी नाहीं॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥ एकाजनार्दनी ज्ञानाशाने । पूजावे श्रीचरण विठोबाचे ॥ १ अत्तर. २ व्यवहार.