पान:संतवचनामृत.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

$ १५०] साक्षात्कार. . २१९ १४९, अष्टही दिशांस देव परिपूर्ण भरल्याने पूर्वपश्चिमभाव उरला नाहीं. अष्टही दिशा पूर्ण भरला देव । मा पूर्व पश्चिम भाव तेथे कैचा ॥ पाहे तिकडे देव व्यापुनि भरला । रिता ठाँव उरला कोठे नाहीं ॥ समाधि समाधान मनाचे उन्मन । मीदेवा भिन्नपण नाहीं नाहीं॥ एकाजनार्दनीं एकपणासाठी। देव पाठी पोटीं भक्तामागे ॥ १५०. उत्तम भूमि शोधून गुरुवचनबोज पेरिल्यावर आलेल्या अनंत पिकाची गणती करणारा कोण ? भूमि शोधोनि साधिले काज । गुरुवचन बीज पेरियेले ॥ कैसे पीक पिकले प्रेमाचें । साठवितां गगन टोचे ॥ सहा चारी शिणले मापारी । सकळ नव्हे अद्याप वरी ॥ एकाजनार्दनीं निजभाव । देही पिकला अवघा देव ॥ १ मग. २ लहान. ३ सहा शास्त्रं. ४ चार वेद. ५ मोजणारा. ६ संपूर्ण,