पान:संतवचनामृत.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६१३८ संतवचनामृत : एकनाथ. आटलिया तेथे कोरडे होईल काई ॥ एकाजनार्दनीं जगचि जनार्दन । जिणे मरणे तेथे सहज चैतन्यधन ॥ १३९, आता आम्हांस अवधैं त्रैलोक्यच आनंदाचे झाले आहे. अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥ एकाजनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे ॥ १४०. एकाजनार्दनापुढे देव स्वयमेव उभा असल्याने देवभक्त . ही भाषा निरसून गेली. अभेद भजनाचा हरिख । देव भक्त जाहले एक ॥ कोठे न दिसे भेववाणी । अवघी कहाणी बुडाली। हारपले देवभक्तपण | जनी जाहला जनार्दन ॥ देव भक्त नाहीं मात । मुळीच खुंटला शब्दार्थ ॥ एकाजनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ॥ १४१. डोळे भरून परब्रह्माच्या सुखाचा सोहळा मी पाहिला. माझे मीपण देहींच मुराले । प्रत्यक्ष देखिले परब्रह्म ॥ परब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरुनी ॥ १ आनंद. २ कथा. ३ नाहीसे झाले. । TTTER - - -