पान:संतवचनामृत.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. दासीची मुलगी. ती कार सुस्वरूप असल्याने आपल्या योग्यतेनुरूप ज्याचे रूप असेल त्यास तिने वरण्याचा निश्चय केला होता. विठ्ठलाखेरीज तिची प्रीति दुसन्या कोणावर जाईना. बेदरच्या बादशहाने आपल्या राजगृहांत तिला सक्तीने बोलाविले असता त्याजकडे जाण्यापेक्षां मृत्यु बरा, असे वाटून तिने पंढरपुरास विठ्ठलासमोरच देह ठेविला. ही गोष्ट शके १३९० मध्ये घडली असे दिसते. ज्या ठिकाणी देवळांत हिला पुरले आहे त्या ठिकाणी एक चमत्कारिक झाड उगवले आहे, ते अद्यापही पाहण्यास सांपडते. या संतांखेरीज इतरही आणखी काही संत होऊन गेले; पण त्यांचे अभंग फारसे उपलब्ध नसल्याने त्यांचा तेथे उल्लेख करता आला नाही याबद्दल खेद वाटतो. एकंदरीत विठ्ठलभक्ति ही सर्व जातींच्या व सर्व वर्णांच्या लोकांस एकत्र कशी करित्ये हे या संतांच्या चरित्रांवरुन उत्तम रीतीने कळून येण्याजोगे आहे. ईश्वरभक्तीत कुळजातिवर्णाचे निष्कारणत्व कसे आहे. याचे प्रतिपादन ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत ( ६. ४१-४६०) फार उत्तम रीतीने केले आहे ते जिज्ञासूंनी पहावें. १५. आता आपण नामदेवाच्या अभंगचर्चेकडे वळू. सर्व भक्तांमध्ये नामदेव व तुकाराम हे अत्यंत आतुर भक्त होते असे म्हणण्यास हरकत नाही. पुढे दोन तीनशे वर्षांनी जसा तुकारामांनी देवाच्या प्राप्त्यर्थ टाहो फोडला, त्याप्रमाणेच यावेळीही नामदेवांनी मोठ्या करुणामय वाणीने देवाची प्रार्थना केली आहे. भ्रमर जसा सुवासावर लुब्ध व्हावा, अगर माशी जशी मधावर लुब्ध व्हावी, तसा मी देवावर लुब्ध झाली आहे, असे नामदेव म्हणतात (क्र. ११). मजसारख्या पतिताचा उद्धार केल्याखेरीज तुला पतितपावन हे नांव शोभावयाचे नाही ( क्र. १३ ). या प्रपंचाशी झोंबी खेळवून आपल्यापासून तूं माझें चित्त परावृत्त केल्याने तूं मजकडून आपला द्रोह मात्र कवितोस (क्र. १६). तूं माझी पक्षिणी असून मी तुझें अंडज आहे; तूं माझी कुरंगिणी असून मी तुझें पाडस आहे ( क. २०), पक्षिणी प्रभाती चरावयास गेली असतां तिचे पिलूं जशी तिची वाट पाहते तशी मी तुझी वाट पाहात आहे (क्र. २२), अग्नीमध्ये बाळक पडलें असतां माता ज्याप्रमाणे कळवळ्याने धावते, त्याप्रमाणे या तापत्रयानीत मी पडलों असल्याने तूं माझ्याकडे धांव (क्र. २३), मृत्यूच्या वेळी माझी स्थिति काय होईल याचा विचार केला असता माझ्या अंतःकरणांत भडभडून येते. जिने मला नऊ मास- पोटांत वाहिले ती आई मला टाकून जाईल; कन्यापुत्रादि बाळे अंती..