पान:संतवचनामृत.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३८] साक्षात्कार. २१५ आत्मयारामाचे ध्यान लागले मज कैसे। क्रियाकर्म धर्म अवघे येणेचि प्रकाशे। सत्य मिथ्या प्रकृति-पर रामचि अवघा भासे ॥२॥ भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योग स्थिति । निर्धारितां न कळे रामस्वरूपी जडली प्रीति । एकाजनार्दनी अवघा रामचि आदिअंतीं ॥३॥ १३७. एकनाथाची स्वराज्यप्राप्ति. हरिखाची गुढी बोधावा आला। अहंकार गर्जतु अविवेकुमारिला ॥ संतोष विवेक आपआपणिया विसरला। लाजुनी महा हारुष आनंदासी गेला ॥ मारविला क्रोध ममता सती निघाली। तुटला मत्सर शांति सुखें सुखावली ॥ एकाजनार्दनीं पाहतां सहजी पैं सहजे । स्वराज्य सौग तेथें नाहीं पैं दुजे ॥ m १३८. आम्ही मरून जिवावांचून जिवंत राहिलो. देह जाईल तरी जावो राहील तरी राहो। दोराचियां सर्पा जिणे मरण ना वावो ॥ आम्ही जितांचि मेलों जितांचि मेलों। मरोनियां जालो जीवेविण ॥ मृगजळाचे जळ भरले असतां नाहीं। १ बोध, २ संपूर्ण. ३ जगणे.