पान:संतवचनामृत.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६११४] साक्षात्कार. २०७ एकाजनार्दनीं । धरिती भेद मनीं ॥ दुहावले येथुनी । निंदक जाण ॥ ११२. तुम्हीं सडासंमार्जन करून गंध उगाळलेत हा मजकडून मोठा अपराध झाला. तुम्हीं कृपालु जी देवा । केली सेवा आवडी॥ करुनि सडासंमार्जन । पाढिले वचन प्रमाण ॥ उगाळूनि गंध पुरविले । सोहोळे केले दासांचे ॥ ऐसा अपराधी पतित । एकाजनार्दनीं म्हणत ॥ ११३. संतसंगतीनें माझें कार्य झाले. संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटले ॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रम । दैन्यदरिद्र दूर गेले । संतपाउले देखतां ॥ . . एकाजनार्दनीं सेवा । करीन मी आपुल्या भावा ॥ ६. साक्षात्कार. ११४, अष्टसात्त्विकभाव उत्पन्न होतांच देव कृपा करतो. सात्त्विका भरणे रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊ लागे॥ कांपे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं। अश्रु त्या भीतरी वाहताती ॥ आनंद होय पोटीं स्तब्ध जाला कंठीं। मौन्य वाक्पुटी धरुनि राहे ॥ १ दूर झाले. २ स्वरूप. ३ भरती. ४ अंगावरील केस. ५ घाम..