पान:संतवचनामृत.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Tala २०८ संतवचनामृत : एकनाथ. [६११४ टाकी श्वासोच्छास अश्रुभाव देखा । जिरवुनी एका स्वरूप होय ॥ एकाजनार्दनीं ऐसे अष्टभाव । उत्पन्न होतां देव कृपा करी ॥ ११५, कानावाटे मी नयनास येऊन शेवटी नयनाचा नयन झालो. कानावाटे मी नयनासी आलो शेखी नयनाचानयन मी जाहालो। दृष्टिद्वारा मी पाहे सृष्टी । सृष्टि हारपली माझे पोटीं॥ ऐसे जनार्दने मज केलें । माझे चित्ताचे जीवपण नेले ॥ एकाजनार्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥ ११६. एकाजनार्दनी सर्वांग डोळा बनतो. चक्षुदर्पणी जग हे पाहा । जगजीवनी मुरुनी रहा । तुर्या कालिंदीतीर्थी नाहा । पापपुण्यासी तिळांजुलि वहा ॥ डोळ्यांना सत्य गुरुची खूण | आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु.॥ तिही अवस्था सांडुनि मागे।अर्धचंद्राच्या चांदण्यांत वागे । चांदणे ग्रासुनि त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें। एवढे ब्रह्मांडफळ ज्या देहीं। ते आटले देखण्याचे पोटी। त्याली पहातां पाठी ना पोटी। मीतूंपणाची पडली तुटी॥ चहूंशून्याचा निरसी जेणे । शून्य नाही ते शून्यपणे। शून्यातीताचे स्वयंभ होणे। शून्य गाळूनि निरशून्यपणे ॥ चार सहा दहा बारा सोळा। ह्या तो आटल्या देखण्याच्या कळा। कळातीत स्वयंभ निराळा । एकाजनार्दनी सर्वांग डोळा ।। १ डोळा. २ आरसा. ३ चवथी अवस्था. ४ स्नान करणे. ५ वियोग, ६ अत्यंत शून्य.. ---