पान:संतवचनामृत.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. २०६ संतवचनामृत : एकनाथ. [६१०९ १०९. जे कायावाचामनाने मला अनुसरतात त्यांचे मी ऋणवैपण पत्करतो. मज जे अनुसरले काया वाचा मनें । त्यांचे चालवणे सर्व मज ॥ ऋणवई त्यांचा अनंत जन्मांचा ।जे गाती वाचा कीर्ति माझी ॥ तयांचिया द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे ॥ सर्व जडभारी जाणे योगक्षम । एकाजनार्दनी नेम जाणा माझा॥ ११०, त्याच्या द्वारांत तिष्ठत राहून त्याचे व्यंग मी पडू देत नाही. मजसी जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धार अंकित त्याचा ॥ त्याचे सर्व काम करीन मी अंग । पडो नेदी व्यंगे सहसा कोठे॥ एकाजनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥ १११. धर्माची वाट मोडून अधर्माची सीग चढते तेव्हां आम्हांस जन्म घ्यावा लागतो. धर्माची वाट मोडे । अधर्मा बी शीग चढे । तैं आम्हां येणे घडे । संसारीस्थति ॥ आम्हां का संसारा येणे । हरिभक्ति नामस्मरणे । जडजीव उद्धरणे । नामस्मरण करूनि ॥ सर्वकर्म ब्रह्मस्थिति । प्रतिपादाव्या वेदोक्ति । हचि एक निश्चिती करणे आम्हां।। नाना मते पाषांड। कर्मठता अति बंड। तयाचे ठेचणे तोंड । हरिभजने ॥ विश्वरूप सृष्टि । अर्जुना दाविली दृष्टी । भित्रभेदाची गोष्टी । बोलूं नये ॥ १ कर्जदार. २ संकट. ३कमान,माप भरल्यावर मग आणखी ढीग करतात तो. ४ नास्तिक मत.