पान:संतवचनामृत.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

O . . . प्रस्तावना .. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी .... ... . लसुण मिरच्या कोथिंबिरी । अवघा माझा झाला हरी ॥ . . मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥..... ... सांवत्याने केला मळा 1 विठ्ठल पायीं गोविला गळा ॥ " या अभंगावरून सांवत्या माळ्यांस अद्वैतसाक्षात्कार होऊन सर्वच हरिमय कसे भासत होते हे उत्कृष्ट रीतीने दिसून येते. नरहरि सोनार हा महाकट्टा शिवभक्त प्रथम देवगिरी येथे राहणाराः तेथून तो पंढरपुरास · रहावयास आला. त्याचे · गुरु गैबीनाथ (पा. भे.-गनीनाथ) असावेत असे दिसते. पांडुरंग हें प्रथम शिवाचे नांव असून ते जसे नंतर विठ्ठलास देण्यात आले, त्याप्रमाणेच नरहरी सोनार हा प्रथम शिवभक्त असून नंतर तो विठ्ठलभक्त बनला. "सोनार • नरहरि न देखे दूत । अवघा मर्तिमंत एकरूप" अशी त्याची स्थिति झाली. हा माघ रुष्ण शके १२३५ मध्ये समाधिस्थ झाला. मंगळवेढे येथे राहणारा चोखा हा खरोखरच वर्तनाने चोख होता; व त्यास शोभेशी त्याची बहीणही निर्मळा होती. हाही. ज्ञानदेवनामदेवांच्या तीर्थयात्रेत होता. मंगळवेढ्यास गांवकुस् बांधीत असतां त्याच्या अंगावर भिंत ढांसळून पडली, व तो तेथे समाधिस्थ झाला. ही गोष्ट वेशाख वद्य ५ शके १२६० मध्ये घडली. त्याच्या रोमरोमांत विठ्ठलनाम भरले होते, अशी त्याची विठ्ठलावर एकनिष्ठ भक्ति होती.. नामदेवाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या अस्थि मंगळवेढ्याहून पंढरपुरास आणिल्या, व त्या महाद्वारासमोर पुरल्या. ज्या जागी मंगळवेढ्यास चोखामेळ्याच्या अंगावर कुसू पडले ती जागा अद्याप तेथे बाजारांत दाखवितात. जनाबाई ही दामाशेट याच्या घरची दासी. ती नामदेवांच्या कुटुंबांतील नसली, तरी ती नामदेवांची एकनिष्ठ भक्त होती. महाराष्ट्रकवयित्रीमध्ये तिचे स्थान उच्च दर्जाचे आहे. एकदां महा- पुरांतून नामदेवांनी पंढरपूर गांव कसे वांचविले हे तिने आपल्या एका अभंगांत सांगितले आहे. सेना हा बेदरच्यां बादशहाचा न्हावी. देवभक्तीमुळे हा पिसा झाला होता, व लोकांसही तो पिसें लावी. आरशांतल्याप्रमाणे आपलें रूप दाखविण्याचा त्याचा धंदा होता. हा शके १३७० मध्ये हयात होता असे दिसते. श्रावण चद्य १२ दिवशी सेना समाप्त झाला, अशाबद्दलचे त्याचे दोन अभंग आहेत (क्र. १२, १३). कान्होपात्रा ही मंगळवेढे येथील श्यामा या नांवाच्या एका