पान:संतवचनामृत.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ संतवचनामृत : एकनाथ. [६८ ८३. संत उदार असून सुरवाडसुखाची प्राप्ति करून देतात. वैकुंठीचे वैभव । संतांपायीं वसे सर्व ॥ संत उदार उदार । देती मोक्षाचे भांडार ॥ अनन्यभावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे । एकाजनार्दनी ठाव । नोहे भाव पालट ॥ ८४. भक्तच देव होतो हा भजनाचा नवलाव किती म्हणून सांगावा? नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तचि होय दवो । वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनी ॥ नाहीं प्रपंचाचे भान । वाचे सदा नारायण ॥ एकाजनार्दनीं मुक्त । सबाह्यअभ्यंतरीं पुनीत ॥ ८५. जो संतांस आवडतो तो देवाचाही देव होतो. संतांसी आवडे तो देवाचाही देव। कळिकाळाचें भेव पायांती।। आणिकाची चाड नसेचि वासना । संतांचिया चरणा वांचूनियां। ऐसे ज्याचे प्रेम ऐशी ज्याची भाक्ति । एकाजनार्दनीं मुक्ति तेथे राबे॥ ८६, आमचे जे सोयरे झाले ते यातिकुळाबाहेर गेले. आम्ही ब्रह्मपुरींचे ब्राह्मण । याति कुळ नाही लहान ॥ आम्हां सोवळे ओवळे नाहीं। विटाळ न देखो कवणे ठाई ॥ आम्हां सोयरे जे जाहाले। ते यातिकुळावेगळे केले ॥ एकाजनार्दनीं बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥ १ सुखकर, अलोट. २ पवित्र. ३ भय.