पान:संतवचनामृत.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ९] देव आणि भक्त. - १९९ देव आणि भक्त. ८७ देव आपला देवपणा विसरून भक्तांच्या सर्व वासना पुरवितो. देवो विसरे देवपणा । अपी वासना भक्तांसी ॥ भक्तदेहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥ जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥ एकाजनार्दनीं अंकित । उभा तेथेचि तिष्ठत ॥ ८८, भाळ्याभोळ्यांस सुख देऊन देव आपण त्याचे दुःख घेतो. कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहूनि घाली धांवा ॥ नवल वैकुंठीच नसे। तो कीर्तनीं नाचतसे ॥ भाळ्याभोळयांसाठी । धांवे त्यांच्या पाठोपाठीं। आपुले सुख तया द्यावें । दुःख आपण भोगावें ॥ दीनानाथ पतितपावन । एकाजनार्दनीं वचन ॥ ८९. देवावर भार घातला असतां तो निर्धाराने योगक्षेम चालवील. घाली देवावरी भार । आणिक न करी विचार। योगक्षम निर्धार । चालवील तुझा ॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळी। प्रेमाचे कल्लोळी । नित्यानंदं सर्वथा ॥ सोस घेई कारे वाचे । रामकृष्ण वदतां साचें। धरणे उठते यमाचें । निःसंदेह ॥ १ पापी लोकांना पावन करणारा. २ अप्रप्ताची प्राप्ति यास योग म्हणतात; व प्राप्तवस्तूच्या रक्षणास क्षेम म्हणतात. ३ वाजवणे. ४ छं द.